ठळक मुद्देयुक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश कविता शिरभाते यांनी कापसे याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.ही घटना 16 डिसेंबर 2017 रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
ठाणे - सहा वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरात लैंगिक अत्याचार करणाऱ्या जनार्दन कापसे (60) याला बुधवारी ठाणे जिल्हा न्यायलयाने 7 वर्ष कारावासाची तसेच 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही घटना 16 डिसेंबर 2017 रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील संजय मोरे यांनी तपासलेल्या पिडीत मुलीसह 10 साक्षीदारांची साक्ष, सदर केलेले पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश कविता शिरभाते यांनी कापसे याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.