नोएडा - शहरात पोलिसांनी एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीत सहभागी ७ परदेशींसह ८ भारतीय महिला चॅटिंग अॅपच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात अडकवायचे. पोलिसांनी या टोळीकडून ३ लॅपटॉप, ३१ मोबाईल्स, ३१ हजार रोकड जप्त केलीय त्याचसोबत ५ पासपोर्ट, १ आधार कार्ड, १ पॅन कार्ड, १ मतदान कार्ड आणि १ बँक पासबुकही पोलिसांच्या हाती लागले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका चॅटिंग अॅपच्या माध्यमातून मित्राने पाठवलेल्या गिफ्टच्या कस्टम चार्जच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत होती. तपासानंतर ६ नायजेरियन युवक आणि एक नायजेरियन महिला, १ भारतीय महिलेला अटक करण्यात आली. या टोळीने १-२ नव्हे तर तब्बल ७०० महिलांना त्यांचं शिकार बनवले होते. डेटिंग अॅपच्या माध्यमातून युवक महिलांशी मैत्री करायचे. ते स्वत:ला नेव्ही अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन करायचे. गुगलवरील नौदलाच्या अधिकाऱ्यांचे फोटो डिपी प्रोफाईलला लावायचे. त्यानंतर महिलांना विदेशी रोकड अथवा गिफ्ट पाठवण्याची वार्ता करायचे. आरोपी पार्सलचा फोटो पाठवून समोरच्याला गंडवायचे.
काही दिवसांनी महिलांना फोन करून महागडे गिफ्ट पाठवले असून कस्टम ड्युटी भरावी लागेल असं सांगायचे. भारतीय महिला कस्टम अधिकारी बनून महिलांकडे पैशांची मागणी करायचे. जाळ्यात अडकलेल्या महिला महागडे गिफ्ट आणि परदेशी रोकड पाहून कस्टम अधिकाऱ्यांना पैसै पाठवायचे. या माध्यमातून एका महिलेकडून ५०-६० हजार लुटायचे. सध्या या बतावणी करणाऱ्या महिलांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने किती जणांना फसवले आहे त्याची चौकशी सुरू आहे.
आरोपींची एक टोळी होती. ते मूळचे आफ्रिकेचे नायजेरियन होते. भारतात २०२१ मध्ये शिक्षण आणि उपचाराचा व्हिसा घेऊन ते राहत होते. ६ महिन्यापूर्वी त्यांचा व्हिसा संपला आहे. तरीही ते लोक त्यांच्या देशात परतले नाहीत. भारतात एकत्रित राहून संघटित गुन्हेगारी करू लागले. बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ते भारतीय महिलांना जाळ्यात ओढत. त्यानंतर विश्वास संपादन करून त्यांचा खासगी नंबर घेत असे. त्यानंतर महिलांना महागडे गिफ्ट, ज्वेलरीसारख्या इतर वस्तू पाठवून त्यांची फसवणूक करायचे.पोलिसांनी जेव्हा या टोळीचा पर्दाफाश केला तेव्हा तब्बल ६००-७०० महिलांना त्यांनी फसवल्याचे उघड झाले.