शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

नात्याला काळीमा! आपलेच जीवावर उठले, 74 वर्षांच्या आजारी आजोबांना फ्रीजरमध्ये कोंडले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 4:04 PM

Telangana Crime News : कुटुंबीयांनी आजोबांना एका फ्रीजरमध्ये बंद करून ठेवलं होतं. वृद्धाच्या मरण्याची ते वाट पाहत होते. मात्र सुदैवानं आजोबांचा जीव वाचला आहे.

सलेम - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहे. अशीच एक भयंकर घटना ही तामिळनाडूच्या सलेममध्ये घडली आहे. घरातील मंडळीच एका आजोबांच्या जीवावर उठल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 74 वर्षांच्या आजारी आजोबांना फ्रीजरमध्ये कोंडण्यात आले होते. तसेच कुटुंबीय आजोबांच्या मृत्यूची वाट पाहत होते. मात्र आजोबांचं नशीब बलवत्तर असल्याने त्यांनी ही जीवन-मरणाची लढाई जिंकली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका 74 वर्षीय आजोबांची प्रकृती गंभीर होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एका फ्रीजरमध्ये बंद करून ठेवलं होतं. वृद्धाच्या मरण्याची ते वाट पाहत होते. मात्र सुदैवानं आजोबांचा जीव वाचला आहे. बालसुब्रमणिया कुमार असं या आजोबांचं नाव असून त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

74 वर्षांच्या आजारी आजोबांना फ्रीजरमध्ये कोंडले

कुटुंबीयांनी मृतदेह ठेवतात त्या फ्रीजर बॉक्समध्ये आजोबांना ठेवलं होतं. फ्रीजर बॉक्स परत नेण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी जेव्हा घरी आला तेव्हा बॉक्समध्ये बंदिस्त असलेल्या आजोबांना पाहून त्याला धक्का बसला आणि हा भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रसंगावधान राखत या कर्मचाऱ्याने आजोबांना फ्रीजर बॉक्समधून बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. 

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

बालासुब्रमणिया कुमार एका खासगी कंपनीत स्टोअर किपरची नोकरी करत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. नातेवाईकांसोबत ते आपल्या घरी राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी बेजबाबदारपणा आणि एखाद्याचा जीव धोक्यात टाकण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना तेलंगणाच्या निजामाबादमध्ये घडली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत लोकांनी एका ढोंगी साधूला चांगलाच चोप दिला आहे. 

ढोंगी साधूचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्थानिकांनी धू-धू धुतलं

साधुने मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने मुलींवर अत्याचार केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनीच तिला या साधुकडे नेलं होतं. ढोंगी साधूने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मुलीवर यशस्वी उपचार करण्याचं आश्वासन मुलीच्या पालकांना दिलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हा ढोंगी साधू पीडित मुलीवर उपचाराच्या नावावर लैंगिक अत्याचार करत होता.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस