मीरारोड - फेसबुकवर अनोळखी खातेधारक तरुणी सोबतची मैत्री मीरारोडच्या तरुणाला ८ लाख रुपयांना पडली. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील स्वप्निल शांतीनगर इमारतीत इमॅन्युअल पिल्ले ( २९ ) हा तरुण आई सोबत राहतो . डिजिटल मार्केटिंग चा व्यवसाय करणाऱ्या पिल्लेची फेसबुक वर इंग्लंडची सांगणाऱ्या मीराबेला जेम्स नावाने असलेल्या कथित तरुणी सोबत झाली . तिने पिल्ले चा व्हॉट्सएप क्रमांक घेतल्यावर दोघांचे चॅटिंग सुरु झाले.
जानेवारी २०२३ मध्ये तिने पिल्ले ला मॅसेज केला की, आपण इंग्लंडवरून दिल्ली आणि तेथून मुंबईत फिरण्यासाठी येणार आहे . दुसऱ्या दिवशी पिल्ले याला कॉल आला की तुमची मैत्रीण एअरपोर्टवर असून तिच्याजवळ ७० हजार पौंड चा धनादेश असल्याने तिला सोडू शकत नाही. कस्टमर एक्साईज ड्युटीसाठी ५८ हजार आणि मनी लॉन्ड्री प्रमाणपत्र साठी ७४ हजार भरले तर सोडू. पिल्ले याने सांगितलेल्या युपीआय आयडी वर पैसे पाठवले.
आयकर शुल्क, हॉटेल खर्च, रुग्णालय खर्च आदी विविध कारणांनी पिल्लेकडे पैश्यांची मागणी केली व पिल्ले ने त्या नुसार ऑनलाईन पैसे दिले . सातत्याने पैश्यांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पिल्ले याने सायबर शाखेत तक्रार केली. सायबर शाखेने तपास केला असता इस्लाम खान नावाच्या यूपीआय आयडीवर तसेच लक्ष्मीकांत नावाच्या व्यक्तीच्या खाते व युपीआय आयडी मध्ये एकूण ७ लाख ९९ हजार रुपये पिल्ले याने दिले होते. ८ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी २ ऑगस्ट रोजी नया नगर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.