शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धक्कादायक! चाकुचा धाक दाखवून ८ जणं घरात घुसले, तिघांचा १५ वर्षीय अनाथ मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 5:15 PM

हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. ही घटना रविवारी मीरपेट पोलीस ठाण्याजवळ घडली, ही घटना समोर येताच नागरिकांनी कारवाईची मागणी करत निषेध व्यक्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठ तरुणांचा एक गट पीडित मुलीच्या घरात घुसला. पीडितेला वरच्या मजल्यावर घेऊन गेलेल्या चार आरोपींपैकी तिघांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी पळ काढला.

ज्वेलर्स दुकान फोडून सव्वातीन कोटींचे सोन्याचे दागिने चोरणारे त्रिकुट जेरबंद!

आरोपींमध्ये काही गुन्हेगार होते. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार केली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी संशयितांनाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. रचकोंडा पोलीस आयुक्त डीएस चौहान यांनीही घटनास्थळी आणि मीरपेट पोलीस स्टेशनला भेट दिली. पीडित अल्पवयीन मुलगी दिलसुखनगर येथील कपड्याच्या दुकानात काम करते. तिला एक लहान भाऊ देखील आहे जो फ्लेक्सीचे काम करतो.

या मुलीच्या आई आणि वडिलांचा काही महिन्यांपूर्वीच मृ्तयू झाला. त्यामुळे ती मुलगी आणि तिचा भाऊ नातेवाईकांकडे राहत होते. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ते पहाटे साडेपाच वाजता कामावरून परत आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास आठ जणांचे टोळके चाकू घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या बहिणीला वरच्या मजल्यावर घेऊन गेले. यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस