शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

महिला डॉक्टरला घातला ८.८९ लाखांचा गंडा; ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:05 IST

महिलेकडून आठ लाख ८९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार ॲन्टॉपहिलमध्ये घडला. याप्रकरणी स्काईप आयडीधारक, खातेधारकांविरोधात ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका महिला डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयातून, मुंबई सायबर क्राईम सेलमधून बोलत असल्याची बतावणी करत सायबर ठगांनी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती घालून जाळ्यात ओढले. महिलेकडून आठ लाख ८९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार ॲन्टॉपहिलमध्ये घडला. याप्रकरणी स्काईप आयडीधारक, खातेधारकांविरोधात ॲन्टॉपहिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

  तक्रारदार डॉक्टर यांना ७ मे च्या सकाळी डिस्पेन्सरीमध्ये असताना अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल आला. त्या व्यक्तीने तुमच्याविरुद्ध मुंबई सायबर क्राईम ब्रँचमध्ये केस दाखल आहे. तुम्ही सहकार्य केले तर, मी तुम्हाला मदत करतो असे सांगितले.  त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून महिला डॉक्टर घाबरली. सायबर क्राईम सेलवरून कॉल येईल असे सांगून फोन ठेवला. काही वेळाने अनोळखी नंबरवरून महिला डॉक्टरला कॉल आला. कॉल करणाऱ्याने सायबर क्राईम सेलमधून इन्स्पेक्टर प्रदीप सावंत बोलत असल्याचे सांगत तुमच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

ॲप डाऊनलोड केले अन्...n तुमच्या आधार कार्डला एकूण २५ बँक खाती लिंक आहेत. या बँक खात्यातून बेकायदेशीर व्यवहार केले जात आहेत. एका खात्यातून २५ लाखांचे बेकायदेशीर व्यवहार झाले असून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी महिला डॉक्टरला मोबाईलवर स्काईप ॲप डाऊनलोड करुन घेण्यास सांगितले. n महिला डॉक्टरने ॲप डाऊनलोड करताच त्याने मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट डॉट ३२ डॉट गव्हर्न्मेंट डॉट इन या आयडीवर मेसेज करायला सांगितला. महिला डॉक्टरने तसे करताच त्यांचे ओळखपत्र व अटक वॉरंट पाठवत व्हिडीओ कॉल केला. n पुढे त्याने वेगवेगळी कारणे सांगून महिला डॉक्टरकडून आठ लाख ८९ हजार ९०५ रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी सावंत यांना कॉल केला. सावंत नॉट रिचेबल झाला.  

टॅग्स :fraudधोकेबाजी