शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नाशिकमध्ये भरधाव बोलेरोने घेतला आठवीच्या विद्यार्थ्याचा बळी; एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने हळहळ

By अझहर शेख | Published: August 11, 2022 3:22 PM

नागरिक व तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी जीपचालक संशयित सम्राट यास पाठलाग करून सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले.

नाशिक : गंगापुररोडवरून हनुमानवाडीमार्गे भरधाव मखमलाबादरोडने महामार्गाकडे जाणाऱ्या बोलेरो जीपच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत एका सायकलस्वार शाळकरी मुलाला धडक दिली. या धडकेत साई मोहन देशमुख (१४.रा.साईराम कॉम्प्लेक्स, देवीमंदिरासमोर) याचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर जीपचालक भरधाव वेगाने गंगापुररोडच्या दिशेने सुसाट निघाला. प्रत्यक्षदर्शी जागरूक दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग करत जुना गंगापुरनाका येथे त्यास रोखून पोलिसांच्या हवाली केले.

मखमलाबादरोडवरुन भरधाव वेगाने बोलेरो जीप (एम.एच३९ जे ३४१४) चालवून निष्काळजीपणे सायकलस्वार मुलाला बुधवारी (दि.१०) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत लहानग्या साईचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीरपणे जखमी झाला होता. रुग्णालयात नेले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अपघातग्रस्त जीपचालक संशयित सम्राट चंद्रकांत पगारे (२७,रा.कळमधरी ता.नांदगाव) याने घटनास्थळी थांबून जखमीची मदत न करता तेथून वाहनासह पसार होणे पसंत केले.

नागरिक व तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी जीपचालक संशयित सम्राट यास पाठलाग करून सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांना अपघातबद्दल माहिती दिली. काही वेळेतच पंचवटी पोलीसदेखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जीपचालक सम्राट पगारे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कमलेश प्रकाश देशमुख (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात