मीरारोड- मीरारोडच्या जांगीड सर्कल भागात वर्दळीच्या भर रस्त्यावर अंकुश राजेश राज या २० वर्षाच्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या ११ जणांच्या टोळक्याने चाकू, तलवारीने हल्ला करून हत्या केली. या प्रकरणी ९ जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य २ जणांचा शोध पोलीस घेत आहे. मामाचे भांडण सोडवल्याचा राग आल्याने आरोपींनी हत्या केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मीरागाव महामार्गावर अमर पॅलेस बार जवळ पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी सोमवारी क्षुल्लक कारणावरून मयत अंकुश चे मामा हर्ष राज व आयुष भानुप्रताप सिंग ( २०) रा . स्नेहल नगरी , काशीगाव यांच्यात भांडण झाले. तेथून पुन्हा मीरारोडच्या एमटीएनएल मार्गावर हर्ष राज व आयुष भिडले . तेथे हर्ष राज ने आयुषला कड्याने मारले . त्यावेळी अंकुश सुद्धा हर्ष राजच्या बाजूने होता व मध्ये पडून भांडण सोडवले. त्याचा राग आलेल्या आयुषने बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदार मित्रांना बोलावलेएमटीएनल मार्ग व जांगीड सर्कल दरम्यान आलेल्या मीरा दर्शन इमारत येथील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजवर अंकुश हा सायंका.
एमटीएनल मार्ग व जांगीड सर्कल दरम्यान आलेल्या मीरा दर्शन इमारत येथील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजवर अंकुश हा सायंकाळी त्याच्या दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. त्यावेळी आयुष्य हा त्याच्या अन्य १० साथीदारांसह चाकू , तलवार घेऊन आला. भर रस्त्यावर वर्दळीच्या वेळात आयुष्य व त्याच्या साथीदारांनी अंकुशवर हल्ला चढवला . त्याला मारहाण , शिवीगाळ करत चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुशला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हल्लीची घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.
भर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या ह्या हत्ये नंतर पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त विलास सानप सह मीरारोड , काशीमीरा , नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक आदी घटनास्थळी दाखल झाले . पोलिसांनी सीसीटीव्ही व माहितीच्या आधारे तात्काळ तपास सुरु केला. गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने वेगाने तपास करत आयुष्य सह आकिब अन्सारी (२०) , फरहान शेख (१९), अरमान लदाफ (१९) सर्व रा , स्नेहल नगरी काशिगाव ; हैदर पठाण (१९) रा . डाचकूल पाडा ह्यांना पकडून मीरारोड पोलिसांच्या हवाली केले.
अशपाक मन्सुरी (२५) रा. स्नेहल नगरी ह्याला काशीमीरा पोलिसांनी पकडले . मेहताब खान (२२) रा . गंगा कॉम्प्लेक्स , नया नगर ; अमीत सिंग (३०) रा . सेक्टर २ , शांती नगर व सरवर हुसेन खान (२३) रा , सेक्टर ३, शांती नगर ह्या दोघांना मीरारोड पोलिसांनी अटक केली. सदर हत्येच्या गुन्ह्यात आता पर्यंत ९ आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या आणखी २ साथीदारांचा शोध सुरु आहे . पोलिसांनी हत्येत वापरलेली शस्त्र जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले .