शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:15 PM

पोलिसांनी बिहारमधील प्रवासी कामगार संजय कुमार यादव याला अटक केली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वी गोरेकुंटा गावात सापडलेल्या 9 पैकी 6 मृतदेह एकाच कुटुंबातील सदस्यांचे होते. जेव्हा निशा त्याला रफिकाबद्दल विचारते, तेव्हा तो योग्य उत्तर देऊ शकला नाही.

तेलंगणाच्या वारंगलच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका विहिरीतून नऊ मृतदेह सापडल्याची घटनेचा छडा लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने नऊ जणांच्या हत्येचा रक्तरंजित डाव आखला ज्यामुळे त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे रहस्य उघड होऊ शकले नाही. पोलिसांनी बिहारमधील प्रवासी कामगार संजय कुमार यादव याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी गोरेकुंटा गावात सापडलेल्या 9 पैकी 6 मृतदेह एकाच कुटुंबातील सदस्यांचे होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या सहा विशेष पथके करीत आहेत. सोमवारी पहिली अटक करण्यात आली तेव्हा 26 वर्षीय आरोपी संजय कुमार यादवने आपला गुन्हा कबूल केल्याचा पोलिसांनी सांगितले आहे. वारंगलचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर यांनी सांगितले की, 21 आणि 22 मे रोजी हे सर्व मृतदेह विहिरीत सापडले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा आरोपी संजय कुमार यादव याचे नाव पुढे आले. आपल्या प्रेयसी रफिकाच्या हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी संजयने हे सर्व क्रूर कृत्य केले.

पुढे डॉ. रविंदर म्हणाले की, ज्या विहिरीतून मृतदेह सापडले त्या विहिरीजवळच एक पोत तयार करण्याचा कारखाना आहे. स्थलांतरित मजूर तेथे राहतात. आरोपी संजय तेथे राहत होता. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी पश्चिम बंगालची रहिवासी निशा आणि कुटुंबातील सहा सदस्य होते. बिहारमधील दोन आणि त्रिपुरा येथील एक तरुणही त्यांच्याबरोबर राहत होता. निशाची भाची रफीका (वय 37) याच्याशी संजयचे अवैध संबंध असल्याचे चौकशीत उघडकीस आले. रफिकासुद्धा पश्चिम बंगालमधील होती, परंतु ती आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तिला तीन मुले होती. इथेच संजयने एक खोली भाड्याने घेतली, जिथे तो रफीकासमवेत राहत होता.रफीकाच्या मुलीवरही काही काळ संजयची चुकीची नजर असल्याचे त्याने सांगितले. हे कळताच रफिकाने संजयला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतरच संजयने रफिकाला ठार मारण्याचा कट रचला. तो मकसूदला सांगतो की, त्याला रफिकाशी लग्न करायचं आहे. यासाठी तो रफिकाच्या कुटूंबाशी बोलण्यासाठी बंगालला जात आहे. ७ मार्च रोजी संजय आणि रफिका पश्चिम बंगालला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. प्रवासादरम्यान संजयने रफिकाला जेवणातून झोपेची गोळी दिली. रफिका बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबला आणि मृतदेह ट्रेनमधून फेकला.यानंतर आरोपी संजय वारंगलला परतला. जेव्हा निशा त्याला रफिकाबद्दल विचारते, तेव्हा तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. यानंतर निशाने तिला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे आरोपीला भीती वाटू लागली आणि त्याने खुनाचा कट रचण्यास सुरुवात केली. आरोपी संजय 16 मे ते 20 मे या कालावधीत मकसूदच्या कुटूंबाला भेटायला जायचा. यावेळी, त्याला २० मे रोजी मकसूदच्या मोठ्या मुलाच्या वाढदिवशी माहिती मिळाली.

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू

 

लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली दारू विकली जात होत पोलीस ठाण्यात 

ही माहिती मिळताच आरोपींने झोपेची औषध खरेदी केली व मकसूदच्या घरी पोचला आणि अन्नात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. यावेळी मकसूदचा मित्र शकीलही उपस्थित होता. कारखान्याच्या पहिल्या मजल्यावर दोन मजूरही होते. आरोपीने त्याच्या अन्नामध्ये झोपेचे औषध देखील घातले. कारण आरोपीला हे सर्वजण रफिकबाबत माहिती उघड करतील अशी भीती होती. यानंतर, जेव्हा सर्वांनी अन्न खाल्ले आणि झोपले. तेव्हा रात्री बाराच्या सुमारास संजय जागा झाला. त्याने सर्वांना पोत्यात बंदिस्त करून विहिरीत टाकले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक