शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

सोशल मीडियावर ९ वर्षाचा मुलगा करत होता अश्लील व्हिडीओ व्हायरल; चक्रावून टाकणारे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 7:47 PM

Child Pornography Case : पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीपोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात पॅन दिल्ली ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला 'ऑपरेशन मासूम' असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या कारवाईदरम्यान अनेक चक्रावून टाकणारे खुलासे झाले आहेत. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निजामुद्दीन पोलीस ठाण्यात ९ वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी मुलाची त्याच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली आहे.

या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलगा दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो ९ वर्षांचा आहे. मुलाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वडिलांच्या मोबाईलचा वापर केला. तसेच त्यासाठी त्याने ई-मेल आयडीही तयार केला होता. मात्र, मुलाचे वडील कमी शिकलेले असल्याने या मुलाकडे अश्लील व्हिडिओ कोठून आले, याची अद्याप उकल होऊ शकलेली नाही.

"मॅडमची तब्येत बिघडली आहे, माझ्या घरी जेवण पाठव!"; ऑडिओ व्हायरल होताच पोलीस निलंबित

एनसीएमईसी (NCMEC) या अमेरिकन सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कालावधीआधी मुलाने हा व्हिडिओ पाठवला होता. एनसीएमईसी ही सामाजिक संस्था सोशल मीडियावरील चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवते आणि अशी प्रकरणं समोर आल्यावर संबंधित देशाला माहिती दिली जाते. एनसीएमईसीने या मुलाच्या प्रकरणाची माहिती एनसीआरबीला दिली आणि एनसीआरबीने ही माहिती दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचवली. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या 

आतापर्यंत 97 जणांना अटक 

स्पेशल सेलचे सायबर क्राईम युनिट आणि सर्व जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने 'ऑपरेशन मासूम' राबविण्यात येत आहे. बाल पोर्नोग्राफीशी संबंधित माहिती सायबर क्राईम युनिटला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) मार्फत दिली जाते. पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटकAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी