२६ लोकांना मृत दाखवून ९६ लाख लुटले; भ्रष्टाचाराचा अजब प्रकार, ५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:58 PM2023-06-22T17:58:20+5:302023-06-22T17:58:51+5:30

या प्रकरणात सीईओच्या डिजिटल सहीचाही गैरवापर करण्यात आला. संबधित शाखेतील २ महिला लिपिकही यात दोषी आढळल्या.

96 lakh looted by showing dead 26 people; Strange type of corruption, crime against 5 people at Shivpuri Madhya Pradesh | २६ लोकांना मृत दाखवून ९६ लाख लुटले; भ्रष्टाचाराचा अजब प्रकार, ५ जणांवर गुन्हा

२६ लोकांना मृत दाखवून ९६ लाख लुटले; भ्रष्टाचाराचा अजब प्रकार, ५ जणांवर गुन्हा

googlenewsNext

शिवपुरी - मध्य प्रदेशात अजब-गजब प्रकार समोर आला आहे ज्याची कुणीही कल्पना केली नसेल. शिवपुरी जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे अनोखे प्रकरण उघडकीस आले. याठिकाणी जिवंत मजुरांना मृत दाखवून ९३.५६ लाख लुबाडले आहेत. या प्रकरणी ५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवपुरी पंचायत समितीत हा प्रकार घडला आहे. 

सरकारच्या एका योजनेचा गैरफायदा घेत भ्रष्टाचाऱ्यांना सरकारलाच चुना लावला. मध्य प्रदेशात बांधकाम मजुरांची नोंदणी करून त्यांना भत्ता दिला जातो. या योजनेत जिवंत मजुरांना मृत दाखवून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पैसे लाटले. यात भ्रष्टाचाऱ्यांनी ९३.५६ लाखांची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात टाकून ती काढली. जिल्हा पंचायत समिती सीईओच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या तपास समितीने हा रिपोर्ट दिला. त्यात २६ लाभार्थ्यांना मृत दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 

या प्रकरणात सीईओच्या डिजिटल सहीचाही गैरवापर करण्यात आला. संबधित शाखेतील २ महिला लिपिकही यात दोषी आढळल्या. या घोटाळ्यात कॅम्प्युटर ऑपरेटर, २ सीईओ, २ महिला लिपिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवपुरी पोलीस अधिकारी अजय भार्गव म्हणाले की, कोतवाली पोलिसांनी आता कलम ४२०, १२० बी अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवपुरीचे सध्याचे सीईओ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील हरिओम शर्मा यांना मृत दाखवून त्यांची पत्नी भारती शर्मा यांच्या खात्यात ४ लाख ६ हजार भरपाई दिल्याचे दाखवले यावरून याची चौकशी झाली असता २६ जिवंत मजुरांना मृत दाखवून पैसे लाटल्याचे उघड झाले. 

Web Title: 96 lakh looted by showing dead 26 people; Strange type of corruption, crime against 5 people at Shivpuri Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.