शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दारूच्या नशेत बापानेच केली मुलाची हत्या; अंगणातील मृतदेह पाहून कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:44 PM

घरातील क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या बापाने मुलाची गोळी झाडून हत्या केली आहे. 

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी व्यसनाधीन बापाने त्याच्या पोटच्या १६ वर्षीय मुलाच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुलाची हत्या करून बाप पसार झाला. आरोपी वडील निवृत्त लष्करी जवान आहे. दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या बापाला मुलाने रोखल्यानं तो संतापला होता. त्यातूनच आरोपी बापाने परवानाधारक बंदुकीतून  मुलावर गोळी झाडली. ज्यात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आग्रा येथील राजपूर चुंगी परिसरात राहणारा धीरज गुर्जर लष्कारातून निवृत्त झाला आहे. धीरज हा व्यसनाधीन होता. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता धीरज दारू पिऊन घरी आला होता. घरी येताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून घरात वाद सुरू झाला. त्यावेळी १६ वर्षीय मुलगा विवेक जनावरांना चारा घालत होता. विवेकने वडील धीरज यांना शिवी देण्यास रोखले. त्यावरून संतापलेल्या बापाचा राग इतका अनावर झाला की त्याने घरात ठेवलेल्या परवानाधारक बंदुकीने विवेकला गोळी झाडली.

वडिलांवर प्रेम करायचा विवेक

मृत विवेकची आई सुधा यांनी सांगितले की, धीरज स्वत:च्या १६ वर्षीय मुलावर गोळी झाडेल याचा विचारही आम्ही केला नव्हता. जेव्हा गोळीचा आवाज ऐकला तेव्हा विवेक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. छोटा भाऊ नितीनही धावत आला. गोळी झाडल्यानंतर धीरज पसार झाला. विवेकला तातडीने आम्ही एसएन मेडिकल कॉलेजला नेले तोपर्यंत खूप वेळ निघून गेली होती. विवेक नववीच्या वर्गात शिकत होता. वडिलांच्या जागी तो घरातील कामे सांभाळायचा. त्याचे वडिलांवर खूप प्रेम होते. विवेक त्याच्या वडिलांना समजावत होता मात्र त्याच वडिलांनी मुलाला कायमचा संपवला. 

दरम्यान, धीरजने १२ वर्ष सैन्यात नोकरी केली होती. दारूचं व्यसन लागल्याने धीरजला सैन्यातून अनफिट केले होते. याचवर्षी त्याला सैन्याने निवृत्ती दिली होती. तो घरी पत्नी सुधासोबत वारंवार भांडण करायचा. या घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी वडिलांचा शोध घेत आहे. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलीस अधिकारी देत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी