शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

लग्न ठरविताना दाखवलेली २० वर्षांची मुलगी; नवरदेव सुहाग रात्रीच्या दिवशीच हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:44 AM

नवरीला घरी घेऊन आल्यावर खरा प्रकार उघड झाला. यामुळे तिच्याशी पहिल्या रात्रीपासूनच शरीर संबंध देखील ठेवले नसल्याचा दावा इरफानने केला आहे.

उत्तर प्रदेशच्या राय बरेलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वनकर्मचारी असणाऱ्या तरुणासोबत घोर फसवणूक झाली आहे. त्याचा २० वर्षांची तरुणी दाखवून ४८ वर्षांच्या महिलेशी विवाह लावण्यात आला आहे. या वनकर्मचाऱ्याने फसवणूक झाल्याची तक्रार एसएसपींकडे केली आहे. सासरच्यांनी तो विरोध करतोय म्हणून त्याच्यावरच हुंडा मागितल्याचा आणि त्रास देत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

बारादरी भागातील मोहल्ला बाजारिया इनायत खान येथे राहणारा मोहम्मद इरफान हा वन विभागाचा कर्मचारी असून तो पिलीभीत येथे तैनात आहे. इरफानच्या म्हणण्यानुसार, लग्न ठरवताना सासरच्या लोकांनी त्याला 20 वर्षांची मुलगी दाखवली. परंतु मे 2021 मध्ये त्याचा 48 वर्षीय महिलेशी विवाह लावून देण्यात आला. 

नवरीला घरी घेऊन आल्यावर खरा प्रकार उघड झाला. यामुळे तिच्याशी पहिल्या रात्रीपासूनच शरीर संबंध देखील ठेवले नसल्याचा दावा इरफानने केला आहे. त्याला दाखवण्यात आलेली मुलगी बदायूं येथील जलनघरी सराय येथील अविवाहित रहिवासी होती. परंतू महिलेशी विवाह लावण्यात आल्याचा विरोध केला असता त्याच्यावर बदायूंमध्ये हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी कोणताही तपास केला नाही. ज्या महिलेसोबत त्याचे लग्न लावण्यात आले, तिच्यावर बरेलीतील एका मानसिक आजाराच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. इरफानचा आरोप आहे की, त्याचे सासरचे लोक त्याला आणि त्याच्या बहिणीला गलिच्छ मेसेज पाठवण्याची धमकी देत ​​आहेत. तसेच त्याची वन विभागातील नोकरी त्या महिलेला मिळावी म्हणून मारण्याचा प्लॅनही त्यांनी बनविल्याचा आरोप इरफानने केला आहे. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश