मलप्पुरम - मागील आठवड्यात केरळच्या मलप्पुरम इथं २५ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सासरच्यांनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं, मग मृत विष्णुजा हिने आत्महत्या का केली असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यादिशेने शोध सुरू झाला. तपासानंतर एक आठवड्यांनी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. पती आणि त्याच्या घरच्यांनी महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विष्णुजाचं लग्न मे २०२३ साली प्रभिनशी झालं होते. घरच्यांनी हे लग्न ठरवले होते. प्रभिन हा हॉस्पिटलमध्ये काम करायचा. तो विष्णुजाचा कायम अपमान करायचा, तू सुंदर नाहीस असं बोलायचा असं मृत महिलेच्या कुटुंबाने आरोप केला आहे. विष्णुजा नोकरीही करत नव्हती त्यामुळे पती तिचा छळ करायचा. सकाळ-संध्याकाळी तिला टोमणे मारायचा इतकेच नाही प्रभिनने विष्णुजाला अनेकदा मारलेही आहे. तू खूप पातळ आहेस, तो तिला बाईकवरही बसवायचा नाही. विष्णुजाने काही परीक्षाही दिल्या होत्या, तिने नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु तिला नोकरी मिळाली नाही असं तिचे वडील वासुदेवन यांनी सांगितले.
मित्रांनी मृत्यूनंतर सांगितलं रहस्य
विष्णुजाला लग्नानंतर खूप त्रास होत होता, तिने तिच्या मित्रांशी यावर बोलली होती. तिच्या मृत्यूनंतर मित्रांनी विष्णुजाच्या घरच्यांना हे सांगितले. प्रत्येक संकटात ती आमच्यासोबत उभी राहायची परंतु आम्हाला कधीही तिच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्याची परवानगी तिने दिली नाही. एका वाईट काळातून ती पुढे जातेय हे कधी चेहऱ्यावर दाखवून दिले नाही. जेव्हा आम्ही तिच्याशी बोलायचो तेव्हा मी सर्वकाही ठीक करेल असं ती आई वडिलांना सांगायची. जावई माझ्या मुलीला मारायचा हे आता माहिती पडले. त्याचे अन्य महिलांशीही संबंध आहेत असं ऐकायला येतंय असा आरोप विष्णुजाच्या वडिलांनी केला.
दरम्यान, प्रभिन विष्णुजाला शारिरीक आणि मानसिक छळत होता. विष्णुजाचा व्हॉट्सअप नंबरही प्रभिनच्या फोनशी जोडला होता. ती कधीही व्हॉट्सअप आमच्याशी उघड बोलत नव्हती. आम्ही टेलीग्रॅमवर बोलायचो, जेणेकरून कुणालाही कळू नये. प्रभिन विष्णुजाचे चॅटिंग पाहायचा कारण तिने कुठल्या मित्राला अथवा कुटुंबाला काही सांगितले नाही का हे पाहायचा. जेव्हा तिला सहन झाले नाही तेव्हा तिने मला हे सांगितले असा दावा मृत विष्णुजाच्या मित्रांनी केला आहे.