नवी दिल्ली : दोन व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहत असतील आणि नंतर त्यांचे नाते बिघडत असेल, तर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. खरे तर असे अनेकवेळा दिसून आले आहे की, एक स्त्री आणि पुरुष लग्नाशिवाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात आणि एक वेळ अशी येते की, त्यांच्या नात्यात दुरावा येतो. त्यानंतर महिलेने पुरुषावर बलात्काराचा आरोप केला. अनेकवेळा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही केला जातो. पण न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही.आताचे प्रकरण राजस्थानचे आहे. जिथे एक महिला आणि एक पुरुष चार वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांचे लग्न झालेले नाही. या नात्यातून तिला एक मुलगीही आहे, पण नंतर स्त्री आणि पुरुषाचे नाते बिघडते. त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. राजस्थान उच्च न्यायालयाने या व्यक्तीला जामीन देण्यास नकार दिला.याच प्रकरणावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्या व्यक्तीला जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर दोन व्यक्ती एकत्र राहत असतील आणि नंतर संबंध बिघडले तर त्यात बलात्काराचे कोणतेही प्रकरण नाही.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही; सुप्रीम कोर्टाने पुरुषाला केला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 5:57 PM