शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच; दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक!

By सुनील पाटील | Published: November 01, 2022 1:23 PM

सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.

जळगाव : मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. दोघांविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा आकाश कुमावत याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला २५ जुलै रोजी अल्पवयीन मुलीला पळविणे व बलात्काराचा (गु.र.नं.०१३६/२०२२ भादवि कलम-३६३, ३७६ (२),(एन) पोस्को व कायदा कलम ४) गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या मुलाला २७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटण्यासाठी सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना भेटले असता त्यांनी तुमचा मुलगा मुलीला घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता, त्यात तुम्ही स्वतः, तुमची पत्नी, भाऊ व तुमची बहीण अशांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० ऑगस्ट रोजी पंचासमक्ष ६० हजाराची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

ही रक्कम गायकवाड यांनी  मिळविण्याचा प्रयत्न केला व इंगोले यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याने सिद्ध झाले. त्यानुसार मंगळवारी सकाळी आठ वाजताच दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावदा येथून ताब्यात घेऊन जळगावात आणले. दुपारी दोघांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, ईश्वर धनगर व राकेश दुसाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हे आढावा बैठकीआधीच कारवाईजिल्हा पोलीस दलाची मंगळवारी सकाळी १० वाजता मंगलम सभागृहात गुन्हे आढावा बैठक होती. नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीसाठी जळगावाला येण्याच्या तयारीत असतानाच इंगोले व गायकवाड यांना एसीबीने ताब्यात घेतले. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक शशिकांत पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी