नवी दिल्ली - लग्न म्हटलं की आनंद आणि उत्साहच संबंधित कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये असतो. लग्नाच्या रणधुमाळीत कुणी पैसा खर्च करते तर कुणी पैसा कमावते. अनेकदा लग्नाच्य वरातीतल नोटांची उधळणही केल्याचं पाहायला मिळतं. तर, नवरदेवाच्या गळ्यात नोटांची माळही घालण्यात येते. मात्र, नवरदेवाच्या गळ्यातील ही माळ पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नवरदेवाच्या गळ्यातील ५०० रुपयांच्या नोटांवाली तब्बल १ लाख रुपये किमतीची माळ लुटण्यात आली आहे. याबाबात, पोलिसांत तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या जगतपुरीत पोलिसांनी आरोपींना अटक केलीय.
३१ जानेवारी रोजी या चोरीसंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. आरोपींनी स्कुटीवरुन येऊन नवरदेवाच्या गळ्यातील ५०० रुपयांच्या नोटांची माळ हिसकावून नेली होती. आरोपींचे वय अंदाजे २० ते २५ च्या दरम्यान असल्याचं पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. दिल्लीच्या जगतपुरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील ५ ते ६ किमी अंतरावरील तब्बल ८० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये, गीता नगर कॉलनीत स्कुटीवरील युवक जात असल्याचं निदर्शनास आलं.
पोलिसांनी गीता नगर कॉलनीतील घर नंबर 2/79 येथून स्कुटीवरील एका युवकास ताब्यात घेतलं. त्यानंतर, २६ वर्षीय जसमीतने गुन्ह्याची कबुली दिली व दुसऱ्या साथीदाराचे नावही पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेतील स्कुटीही ताब्यात घेतली आहे.
आरोपी जसमीतसिंह हा फूड डिलीव्हरी कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो, ड्रग्ज एडिक्ट असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून ५०० रुपयांच्या २० नोटा जप्त केल्या आहेत. या दोन्ही आरोपींनी चैन स्नॅचिंगप्रकरणातही गुन्हे केल्याचीह समोर आले आहे.