शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

रोटोमॅक कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल, ७५० कोटींचा कर्ज घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:50 AM

या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पेनांची निर्मिती करून देशभरात त्याचे वितरण करणाऱ्या रोटोमॅक या कंपनीने सन २०१२ साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील सात बँकांकडून एकूण ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. 

मुंबई : पेनाची निर्मिती करणाऱ्या रोटोमॅक कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखाली सात बँकांनी दिलेल्या कर्जाच्या रकमेपैकी एकूण ७५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या लखनौ शाखेतील बँक मॅनेजरने सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पेनांची निर्मिती करून देशभरात त्याचे वितरण करणाऱ्या रोटोमॅक या कंपनीने सन २०१२ साली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील सात बँकांकडून एकूण ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. 

कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करण्यासाठी या पैशांची आवश्यकता होती. मात्र, कंपनीने कर्जापोटी प्राप्त या पैशांचा वापर करत आंतरराष्ट्रीय पातळीवर किती व्यवहार केला, कुठे केला, याची कागदपत्रे कंपनी बँकेला सादर करू शकली नाही. बँकेने वारंवार सूचना करूनही ही कागदपत्रे न दिल्याने बँकेने या प्रकरणाचे फोरेन्सिक ऑडिट केले होते. यामध्ये कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम कंपनीने अवैधरीतीने वापरल्याचे निष्पन्न झाले.

कंपनीच्या ताळेबंदात फेरफार कंपनीच्या ताळेबंदातदेखील मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचे दिसून आले. याचसोबत कंपनीने कर्जापोटी घेतलेल्या पैशांचीदेखील परतफेड थांबवली होती. यानंतर बँकेने सन २०१६ मध्ये हे कर्ज खाते थकीत असल्याचे घोषित केले. या प्रकरणाचा ईडीनेही यापूर्वीच तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँक