मीरारोड - कायदेशीर कचाट्यात असलेली सदनिका सोडवून देण्यासाठी २० लाखांची फी महिला वकिलाची ठरली असताना त्यातील १४ लाखांचा धनादेश वकिलाच्या पती कडून हिसकावून घेतल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात बाप - लेका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मीरारोडच्या अंतरिक्ष टॉवर मध्ये राहणाऱ्या ऍड . वंदना जाधव - बोदडे जुबेर खान व हार्दिक सेठ त्यांचे प्रकरण घेऊन आले होते. सराईत भामटा असलेल्या योगेश कारंडे याने शांती नगर सेक्टर १, अमिषा शांती मधली सदनिका त्या दोघांना विकून फसवणूक केल्याचे व सदनिका न्यायालयाच्या आदेशा नुसार पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले . ऍड . वंदना यांनी न्यायालयात याचिका करून सदनिका मिळवण्याची कार्यवाही नाही १० लाख रुपयांची फी सांगितली . दरम्यान ऍड . वंदना यांचे पती शरद बोदडे यांचा मित्र रामसजीवन राजनंदन सिंग याने ती सदनिका विकत घेण्याची तयारी दर्शवली. खान व सेठ यांनी त्यांची सदनिका सिंग याना ६५ लाख रुपयांना विकण्याचे समझपत्र केले . त्या ६५ लाखात २० लाख रुपये ऍड . वंदना यांची फी ठरली . डिसेम्बर २०१९ मध्ये त्यांच्यात नोंदणीकृत करारनामा झाला त्यात सदनिकेची किंमत ४९ लाख ७५ हजार नमूद केली.
सिंग याने ४ लाख फी दिल्यावर ऍड . वंदना यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली व मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने सिंग यांचे बाजुने निकाल दिला . त्या नंतर मात्र सिंग याने सदनिकेच्या मुळ मालकांना दयावयाची खरेदी रक्कम व ऍड . वंदना यांनी उर्वरीत १६ लाखांची फी देण्यास टाळाटाळ चालवली . एप्रिल मध्ये सिंग याने १ लाख रोख व १४ लाखांचा धनादेश ऍड . वंदना याना दिला . मे मध्ये सिंग याने गृहनिर्माण संस्था रजिस्टारकडे चाललेली याचिका ऍड . वंदना यांच्या कडून काढून दुसऱ्या वकिलास द्यायचे सांगितले . त्यावर आपली उर्वरित फी दिल्यावर दुसरा वकील करा असे ऍड . वंदना यांनी सांगितले.
सिंग याने सव्वातीन लाख दिल्या नंतर सिंग व त्याची पत्नी फलकमारी, मुलगा मनिष व उमेश हर्षवाल यांनी ऍड . वंदना यांच्या घरी जाऊन ते परत मागून घेतले व त्या बदल्यात त्यांना धनादेश दिला. सिंग याने ऍड . वंदना यांना संदेश पाठवून तुमचे पैसे रोखीने देतो , तुम्हाला दिलेले १४ लाख व सव्वातीन लाखांचे धनादेश माझ्या कार्यालयात आणून द्या असे सांगितले. त्यानुसार पती शरद बोदडे हे भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोरील सिंग याच्या कार्यालयात दोन्ही धनादेश देऊन गेले. त्यावेळी बोदडे व सिंग आणि त्यांचा मुलगा मनिष यांच्यात बोलाचाली होऊन वाद झाला . त्यावेळी सिंग व मनीष याने १४ लाख रुपयांचा धनादेश बोदडे यांच्या कडून जबरीने हिसकावून घेत मारहाण केली म्हणून ऍड . वंदना जाधव यांच्या फिर्यादी नुसार २३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.