नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेगाव येथील ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांना हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कमाणीजवळ मार्कंडे हॉटेल समोर दरेगाव तांडा येथील दोन इसमाकडून बुटाने मारहान करण्यात आली.
केरबा धोंडीबा सुर्यवंशी दरेगाव येथील ग्रामपंचायतला नित्याचे कामकाज अटोपून शासकीय कामानिमित्त पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे आले होते. त्यावेळी आरोपी नामे संतोष बन्सीलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड यांनी फोन करुन साहेब कुठे आहात? आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र पाहिजे तुम्ही कमानीजवळ या असे त्यांना सांगितले.
ग्रामसेवक सुर्यवंशी हे बेबाकी प्रमाणपत्र घेऊन परमेश्वर कमाणी जवळील चहाच्या हॉटेलजवळ थांबले असता आरोपी संतोष आणि मोहन यांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी तुमचा फोनच लागत नाही. तुम्ही आमचा फोन उचलत नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरुन आम्हाला प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहात का? तुमची अवकात काय आहे? आता तुम्हाला खतमच करतो म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली व आर्वाच्छभाषेत शिविगाळ करुन कॉलर धरली व बुटाने मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी शासकीय कामाची कागदपत्रे फाडून नासधूस केली व शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद संबंधीत ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. फिर्यादिवरुन आरोपी नामे संतोष बन्सिलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक बि.डी.भूसनर हे करीत आहेत.