मीरारोड - परस्पर गाडीची ४ लाखांना विक्री करून खरेदीदाराची फसवणूक करणाऱ्या गोरेगावच्या कार डीलर वर मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या शांतिपार्क मधील युनिक क्लस्टर मध्ये राहणारे विनोद पवार यांना जुनी कार खरेदी करायची असल्याने मित्र अमोल रांजणे व त्याच्या माध्यमातून ओळखीचा कार डीलर भूषण चुरी रा . विरार यांना सांगितले होते . चुरी याच्या माध्यमातून विशाल विलास चाळके (४०) रा . म्हाडा वसाहत , राम मंदिर , गोरेगाव पश्चिम हा कार डीलर त्याच्या कडील गाडी घेऊन मीरारोड येथे डिसेम्बर २०२२ मध्ये आला होता.
पवार यांना गाडी आवडली व त्याचा ४ लाखात सौदा ठरला . मात्र गाडीचे मूळ आरसी बुक नसल्याने ते दहा दिवसात आणून देतो असे चाळकेने सांगितले. मित्र अमोल रांजणे समक्ष पवार यांनी चाळके याला ४ लाख रोख दिले . चाळके याने कोऱ्या कागदावर गाडी विक्री केल्याचे लिहून घेतले व त्या नंतर गाडी, बँकेची नाहरकत व आरसी बुक ची छायांकित प्रत पवार यांच्या कडे दिली . मूळ आरसी बुक आणून द्या व गाडफी नावावर करून द्या म्हणून पवार यांनी चाळके कडे कडे पाठपुरावा चालवला होता . मात्र तो टाळाटाळ करत होता . दरम्यान ८ जून २०२३ रोजी गाडीचे मूळ मालक भगवानराव तकारखेडे हे त्यांच्या सहकाऱ्यां सह येऊन त्यांच्या कडील चावीने गाडी घेऊन गेले . पवार यांनी सदर प्रकार चाळके ह्याला सांगितल्यावर त्याने पैसे परत करतो असे आश्वासन दिले . मात्र तो पैसे परत करत नसल्याने १ ऑगस्ट रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात चाळके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .