सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-५ येथील शासकीय अपंग बालगृहातून मूकबधिर, कर्णबधीर व गतिमंद असलेल्या दोन मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा गुरवारी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला. जिल्ह्यात गतिमंद, मुकबधीर, कर्णबधिर मुलांना ठेवण्यासाठी कोणतेही शासकीय बालगृह नसल्याने अश्या मुलांना अपंग मुलाचे शासकीय बालगृहात ठेवले जाते. गायब मुलांचा पोलीस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-५, गांधी रोड परिसरात अपंग शासकीय बालगृह असून बालगृहात गतिमंद, कर्णबधिर, मुखबधिर, अपंग असे एकून ९ मुले आहेत. विकास मतिमंद शाळा व पालवी मुखबधिर व कर्णबधिर शाळेत ते मुले शिक्षण घेतात. त्यातील १४ व १७ वर्षाचे असे दोन अपंग, कर्णबधिर, मुखबधिर व गतिमंद असलेले मुले गुरवारी पासून गायब झाली. शासकीय बालगृहाच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात अपंग, कर्णबधिर, मूकबधिर व गतिमंद असलेल्या दोन मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा गुरवारी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. तसेच मुलांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती दिली.
अपंग शासकीय बालगृहाचे अधीक्षक प्रवीण दिंदोडे यांनी मात्र शुक्रवारी मुले बालगृहातून गेल्याची माहिती दिली. तसेच त्यांचा शोध घेतला असता, दोघा पैकी एकाचा शोध लागला आहे. तर दुसरा मुलगा रात्री पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात गतिमंद, मुखबधिर, कर्णबधिर मुलांना ठेवण्यासाठी शासकीय बालगृह नसल्याने, अपंग शासकीय बालगृहात ठेवले जात असल्याचे सांगितले. एकून ९ मुला पैकी अर्धे मुले पालवी कर्णबधिर व मुखबधिर शाळेत शिक्षण घेत असून इतर मुले विकास गतिमंद शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती प्रवीण दिंडोदे यांनी दिली. एकेकाळी अपंग मुलाच्या शासकीय बालगृहात असंख्य मुले असत, त्याच ठिकाणी त्यांना आयटीआयचे प्रशिक्षण दिले जात होते. कालांतराने मुलांची संख्या कमी झाल्याने, अपंग बालगृहाची पडझड होऊन दुरावस्था झाली आहे.