शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगलीत महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 9:49 PM

शरद जाधव  सांगली : शहरातील कर्नाळ रोड परिसरात राहण्यास असलेल्या महाविद्यालयीन युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात ...

शरद जाधव 

सांगली : शहरातील कर्नाळ रोड परिसरात राहण्यास असलेल्या महाविद्यालयीन युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अजित बाबुराव अंगडगिरी (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. तिघांनी पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अजित हा कर्नाळ रोडवरील एका हॉटेलजवळ कुटूंबियांसह राहण्यास होता. याच ठिकाणी त्याच्या वडीलांची पानपट्टी आहे. तर अजित हा सांगली शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याला फोटोग्राफीची आवड होती.

अंगडगिरी कुटूंबियाने पदमाळे फाटा येथील म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर असलेले एक शेत कसण्यास घेतले आहे. बुधवारी दुपारी मयत अजित त्याची आजी व इतर महिलांसह शेतात मशागतीचे काम करत होता. याचवेळी तिघे संशयित तिथे आले व त्यांनी अजितला रस्त्यावर बोलवून घेतले. यावेळी तिघातील एका संशयिताने धारदार शस्त्राने अजितच्या छातीवर वार केला. एकच वार वर्मी लागल्याने तो तिथेच खाली कोसळला. यानंतर तिघेही संशयित तिथून पसार झाले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी