पाटणा : बिहारमधील समस्तीपूर येथे एका खासगी आरोग्य केंद्रातील कंपाउंडर आणि इतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत एका २८ वर्षीय महिलेवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली, त्यातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
राज्याची राजधानी पटनापासून ८० किमी. अंतरावर असलेल्या समस्तीपूर जिल्ह्यातील मुसरीघरारी या छोट्याशा गावात ही घटना घडली. बबिता देवीच्या नातेवाइकांनी सांगितले की, त्यांनी तिला अनिशा आरोग्य केंद्रात नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आणले होते. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु, नंतर कंपाउंडर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरसावला.
संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीसकाळी ११:००च्या सुमारास त्यांनी प्रक्रिया सुरू केली. सुमारे एक तासानंतर, त्यांनी तिला रुग्णवाहिकेत टाकले आणि १० किलोमीटरवरील मोहनपूर येथील रुग्णालयात नेले. तिला स्पर्श केला तेव्हा शरीर थंड होते. तिचा मृत्यू आधीच झाला झाला होता, असा आरोप महिलेच्या काकांनी केला. नातेवाइकांनी मृतदेह अनिशाच्या आरोग्य केंद्रात आणून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.