मुंबई : प्रॉव्हिडंट फंंड खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करणाऱ्या प्रॉव्हिडंट फंट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने पुण्यात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ही नोकरी मिळवण्यासाठी ज्याने संबंधित अधिकाऱ्याला लाच दिली. त्याला शासकीय नियमांची पूर्तता केल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नाही हे माहीत असूनही त्याने ही लाचखोरी केल्याबद्दल त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
- उपलब्ध माहितीनुसार, प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या पुणे विभागामध्ये मनीष कुमार नावाची व्यक्ती वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सुशांत कुमार नावाच्या एका व्यक्तीला त्याने प्रॉव्हिडंट फंड विभागात नोकरी लावण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे देण्यासाठी सुशांत कुमार याने मनीष कुमार याच्या बँक खात्यामध्ये वेळोवळी भरले.
पत्रही बनावट आणि... सहीसुद्धा बनावटयातील काही रक्कम त्याने रोखीने त्याच्या खात्यात जमा केली, तर काही पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर केले होते. हे पैसे प्राप्त झाल्यानंतर मनीष कुमार याने प्रॉव्हिडंट फंड विभागाचे बनावट लेटरहेड तयार केले व त्यावरून त्याच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. तसेच, या पत्रावर संबंधित विभागात कार्यरत असलेल्या प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या आयुक्तांची त्याने बनावट स्वाक्षरी केली. ही घटना लक्षात आल्यानंतर प्रॉव्हिडंट फंड विभागातील संबंधित आयुक्ताने सीबीआयकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने मनीष कुमार व सुशांत कुमार या दोघांविराधोत गुन्हा दाखल केला आहे.