पुणे : सावकाराने २८ लाखांची अवाजवी मागणी केल्याने कुरुंगवडी येथील सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३, रा. कुरंगवडी, ता. भोर) यांनी शेतातील झाडाला दोरीचा फास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर) यांचे विरुध्द फिर्याद वैशाली सतीश शिळीमकर यांनी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी तक्रारीनुसार सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अमृत महादेव शिळीमकर याने कुरंगवडीत येथील सतीश शिळीमकर यांना कर्ज दिले होते. सावकारीचा विळखा पडल्याने तालुक्यातील अनेक असह्य कर्जदार मेटाकुटीस येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला आहे. सावकारी कर्जामुळे या तरूणाने आत्महत्येसारखा भयंकर प्रकार केल्याने या प्रकाराकडे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सतीश शिळीमकर यांनी त्याच्या कुरंगवडी येथील शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतला होता. या वेळी त्यांच्या पँटच्या डाव्या खिशात लिहलेली चिठ्ठी मिळून आली.त्यात सतिश याने तांभाड येथील अमृत शिळीमकर यांचे कडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजासह २८ लाखांची मागणी करीत आहेत. २८ लाख रुपयांची मागणी करून पैसे परत दिले नाही तर जमिन नावावर करून दे अशी मागणी करीत असलेमुळे त्याचे व्याजाने घेतलेल्या पैशाचे मागणीला, धमकीला व जाचहाटाला कंटाळुन पती सतिश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्या केली असल्याचे सतिश यांची पत्नी वैशाली यांनी त्यांचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पुढील तपास पो नि सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. नि. संजय सुतनासे तपास करीत आहेत.