शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

बोगस फिजिओथेरपिस्ट्सचा सुळसुळाट; रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 7:24 AM

कोणत्याही फिजिओथेरपिस्टला प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये शिक्षण घेणे बंधनकारक असते.

मुंबई : कोणत्याही प्रकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसताना शहरात बोगस फिजिओथेरपिस्ट्सनी धुमाकूळ घातला आहे. ही मंडळी रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे विदारक चित्र शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये सर्रास दिसून येत आहे. बनावट फिजिओथेरपिस्ट्सवर नियंत्रण मिळविण्याबाबत सरकारी पातळीवरही अनास्था आहे.

कोणत्याही फिजिओथेरपिस्टला प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये शिक्षण घेणे बंधनकारक असते. फिजिओथेरपिस्टसाठी बॅचलर ही पदवी साडेचार वर्षांची असून, मास्टर ही पदवी तीन वर्षांची आहे. नाशिक शहरात नाशिक जिल्हा फिजिओथेरपिस्टकडे नोंद असलेले केवळ ९५ फिजिओथेरपीस्ट आहेत. केवळ अनुभवाच्या आधारे ही मंडळी प्रॅक्टिस करीत आहेत. फिजिओथेरपिस्टने काम सुरू करताना राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील फिजिओथेरपिस्ट संस्थांकडे नोंदणी करणे अनिवार्य असताना अनेकांनी केलेली नाही. ज्यांच्याकडे शिक्षण आहे अशाच व्यक्तींना नोंद करता येत असल्याने याकडे कुणी वळत नाही.

त्यांनाच परवानगीआमच्या संघटनेकडून बोगस फिजिओथेरपिस्टची यादी सरकारला दिली जाणार आहे. महाराष्ट्र कायदा २००४ (२) नुसार, नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टखेरीज कोणतीही व्यक्ती फिजिओथेअरपीचा व्यवसाय करू शकत नाही. परिषदेकडे नोंदणी असललेल्या व्यक्तीलाच फिजिओथेरपिस्ट म्हणून ग्राह्य धरले जाते. - डॉ. आनंद मिश्रा, फिजिओथेरपिस्ट असोसिएशन

सरकारी अनास्थापैसे वाचवण्याच्या दृष्टीने अनेक रुग्णालयांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले फिजिओथेरपिस्ट नोकरीला ठेवलेले नाहीत. बोगस फिजिओथेरपिस्टवर नियंत्रणाबाबत सरकारतर्फे कुठलीही यंत्रणा नाही. मोठमोठ्या रुग्णालयांतही फिजिओथेरपिस्टची मागणी वाढल्याने यासंदर्भातील अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विविध संस्थांचे पेव फुटले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सअंतर्गत विविध अभ्यासक्रम घेतले जातात. मात्र, ते मान्यता प्राप्त आहे अथवा नाही याची शहानिशा करूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे गरजेचे आहे. रुग्णांनी प्रमाणित फिजिओथेरपिस्टकडूनच योग्य उपचार घेणे गरजेचे ठरते.