शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बनावट नोटा चलनात आणणारी पश्चिम बंगालमधील टोळी जेरबंद!

By नरेश डोंगरे | Published: May 14, 2024 11:50 PM

पाच बंगालमधील तर दोघे पुण्यातील : रेल्वे पोलिसांनी लावला छडा

नागपूर : रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी पाचशेंच्या नकली नोकटा चलणात आणून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा छडा लावून त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी रेल्वे पोलिसांनी बजावली आहे. लखफर अखलू मंडल (वय ४२), मामून लखपर मंडल (वय १९), इंद्रजित रामचरण मंडल (वय ३३), संतोष पांचू मंडल (वय ३२, सर्व रा. मुर्शिदाबाद जिल्हा, प. बंगाल) आणि यमुनाकुमार वामननाथ प्रसाद (३५, रा. मोरया कॉलनी, गणपती मंदिराजवळ मावळ, पुणे), किशोर रघुनाथ शिंदे (वय ३२, रा. चाकण पुणे) आणि शशिकला उर्फ सानिका प्रकाश दाैडकर (वय ४२, रा.विशालगड चाकण, पुणे) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे, ३ एप्रिलला सकाळी या टोळीतील लखफर मंडल या आरोपीने नागपूर स्थानकावर तिवारी नामक वेंडरकडून जेवणाची थाळी विकत घेतली होती. ५०० ची नोट देऊन त्याने साडेचारशे रुपये परत घेतले अन् घाईगडबडीत निघून गेला. त्यामुळे तिवारीला संशय आला अन् त्याने ती नोट तपासली असता ती नकली असल्याची शंका त्याला आली. त्याने हा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यामुळे शोधाशोध करून आरोपी लखफर मंडलला पकडण्यात आले. त्याच्या तपासातून पुण्यात त्याचे साथीदार अशा प्रकारे नकली नोटा चालविण्याचे रॅकेट चालवित असल्याचे पुढे आले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी धडक देत उपरोक्त आरोपींना अटक केली.

दीड महिन्यांच्या परिश्रमाला यशया गुन्ह्याची उकल करण्यासाठी रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक निलम डोंगरे, हवलदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, सतश बुरडे, प्रवीण खवसे, अमोल हिंगवे, मजहर अली, रोशन मोंगरे , समीर खाडे, बबलू वरठी, विशाल मिश्रा, रोशना डोये आदींनी तब्बल दीड महिना परिश्रम घेतले आणि अखेर या टोळीला अटक करण्यात यश मिळवले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी