शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

देशभरात भटकंती करून लॅपटॉप चोरायचे, टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:09 PM

अटक केलेले तिघेही तामिळनाडूचे असून भारतभर भटकत ते लॅपटॉप चोरी करायचे. त्यांच्याकडून ९ लॅपटॉप जप्त करून सहा गुन्ह्यांची उकल झाली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

नवी मुंबई : कारची काच फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या तिघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. दोन कारच्या काचा फोडून त्यामधील लॅपटॉप चोरून ते पसार होत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेले तिघेही तामिळनाडूचे असून भारतभर भटकत ते लॅपटॉप चोरी करायचे. त्यांच्याकडून ९ लॅपटॉप जप्त करून सहा गुन्ह्यांची उकल झाली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

वाशी रेल्वेस्थानक परिसरातील दोन कारच्या काचा फोडून त्यामधील लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली होती. या दोन्ही लॅपटॉपचे लोकेशन ऑन असल्याने लॅपटॉप मालक अमेय विचारे व अभिषेक बैरवान यांना मोबाइलवर त्याची माहिती मिळत होती. त्यांनी वाशी पोलिसांकडे लॅपटॉप चोरीची तक्रार केली होती. 

लोकशनमुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाला चोरीला गेलेले लॅपटॉप हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात दिसून आले. यामुळे वाशी पोलिसांनी रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तिघा संशयितांची झडती घेतली  त्यामध्ये ९ लॅपटॉप आढळून आले.  

तामिळनाडूचे राहणारे, साथीदारांचा शोध सुरूपोलिसांनी सेनिथील दूरायरजन कुमार आर. डी. (४८), मूर्ती रामासामी चिन्नाप्पन (३०) व शिवा विश्वनाथन (४७) यांना अटक केली. आता पोलिस त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेत आहेत. सर्वजण तामिळनाडूचे राहणारे असून भारतभर ते भटकंती करून लॅपटॉप चोरी करत होते.

लॅपटॉपचे लोकेशन मिळाल्याने लागले हातीमागील २० दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी भटकंती करत लॅपटॉप चोरी करत होते. त्यांच्याकडून वाशी, नवघर, मुलुंड, सीबीडी, नाशिक, पुणे तसेच पंढरपूर येथील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारची काच फोडून त्यामधील लॅपटॉप चोरी करत होते. वाशीत त्यांनी एकाच वेळी दोन कारमधील लॅपटॉप चोरले होते. मात्र लॅपटॉपचे लोकेशन मोबाइलवर मिळत असल्याने ते पोलिसांच्या हाती लागले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी