पणजी: अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडीत बालिका या प्रकारानंतर गरोदर राहिली असल्याचेही निदान झाले आहे.
पणजी महिला पोलिस स्थानकात या प्रकरणात संशयित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार बराच पूर्वी घडला होता, परंतु मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. बालिकेच्या वैद्यकीय चाचणी नंतर ती गरोदर असल्याचे निदान झाले आहे. यानंतर मुलीच्या पालकांकडून पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर महिला पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, महिला पोलिसांकडून संशयित मुलाला ताब्यात घेतले असून बाल कल्याण समितीसमोर त्याला उपसथित केले आहे. त्याची चौकशीही करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलाने आपल्या कृत्याची कबुलीही दिली आहे.