दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:41 PM2022-02-20T17:41:47+5:302022-02-20T17:46:17+5:30
Murder Case : दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
उधम सिंह नगर : लग्नादरम्यान पती-पत्नी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देतात, पण उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमध्ये पत्नीच पतीच्या जीवावर उठली. दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रकरण खतीमा कोतवाली परिसरातील कुंआखेड़ा गावचे आहे. येथे राहणारे भगीरथ राणा (वय 30) यांच्या कुटुंबीयांनी 13 फेब्रुवारी रोजी भगीरथ हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भगीरथ राणाचा शोध सुरू केला. दरम्यान, शनिवारी सकाळी बेपत्ता भगीरथ राणा यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, कुंआखेड़ा गावातील कालव्याच्या काठावर खड्ड्यात पुरलेला मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. नातेवाईकांनी मृतदेह भगीरथ राणाचा असल्याची ओळख पटवली, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
प्रेमात अडथळा येत असल्याचे पाहून जीवे मारण्याचा कट आखला
खतीमा कोतवालीच्या एसपी ममता बोहरा घटनास्थळी पोहोचल्या. त्याने सांगितले की, मृत भगीरथ राणाची पत्नी राजनंदानी हिचे गावातील संकेत राणा याच्याशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार तिच्या पतीला कळला होता. प्रेमाच्या मार्गातील अडथळा पाहून पत्नी आणि तिच्या प्रियकराने भगीरथला त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा डाव रचला. १३ फेब्रुवारीला संध्याकाळी संकेत आणि राजनंदानी यांनी भगीरथला घराजवळील नाल्यावर बोलावले. जिथे त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपींनी डोक्यात दगड घालून अनेक वार केले. त्याचवेळी मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.
सावत्र भाऊ अनेक महिने अल्पवयीन बहिणीवर करत होता बलात्कार, मोबाईलमुळे फुटले बिंग
वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक
या कलमान्वये गुन्हा दाखल
त्याचवेळी मृत्यूची बातमी समजताच मृताची आई रामसरी देवी आणि दोन्ही मुलांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर मुलाची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सध्या पोलिसांनी राजनंदानी आणि तिच्या प्रियकरावर भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.