देशभरात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष दणक्यात, उत्साहात साजरा केला जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #हरघरतिरंगा ही मोहीम सुरू केली आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.. ऐकीकडे आपण स्वातंत्र्याचा उत्साह साजरा करत असताना राजस्थानमधली जालौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने केलेल्या माहराणीत जीव गमवावा लागला. ही घटना सायला ठाणे पोलीस क्षेत्रातील सुराणा गावातील एका खाजगी शाळेतील आहे. जिथे शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. त्या विद्यार्थाने शाळेतील शिक्षकांसाठी असलेल्या मडक्यातून पाणी प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.
मारहाणीत विद्यार्थ्याला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यानंतर तेथून अहमदाबाद येथे घेऊन गेले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. इंद्र कुमार असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सुराणा गावातील सरस्वती विद्यामंदिर शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. मयत इंद्र कुमारचे काका किशोर कुमार यांनी शाळेचे संचालक छैल सिंग यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केलं आणि त्यानंतर मारहाण करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रिपोर्टनुसार २० जुलैला इंद्र नेहमीप्रमाणे शाळेत गेला आणि तेथे त्याला तहान लागली म्हणून त्याने शाळेत असलेल्या मडक्यातून पाणी प्यायले. ते मडके संचालक छैल सिंग यांच्यासाठी खास ठेवले गेले होते. याची माहीती मिळताच संचालकांनी जातीवाचक शिविगाळ केली आणि इंद्रला बेदम मारले. त्यात त्याचा डोळा व कान सुजले होते आणि त्याला अंतर्गत जखमाही झाल्या होता. इंद्रने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. इंद्रवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, परंतु १३ ऑगस्टला इंद्रने जीव सोडला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोपिंना अटक करण्यात आल्याची माहिती दिली.