शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन पळवला; चोराला सायन स्टेशनवरुन अटक

By गौरी टेंबकर | Published: October 25, 2023 5:59 PM

धारावी पोलिसांची कारवाई

मुंबई: ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन खरेदी करायचा असल्याचे सांगत तो पळवून नेणाऱ्या आसिफ हुसेन आरिफ हुसेन शेख, उर्फ भुरा (४०) नामक चोराला मंगळवारी अटक करण्यात आली जो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. धारावी पोलिसांनी सायन रेल्वे स्टेशन वरून त्याच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास सुरू आहे.

सदर प्रकरणातील फिर्यादीने त्यांचा जवळपास १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल ओएलएक्सवर विक्रीकरीता ठेवला होता.  आरोपीने १९ जुलै रोजी त्यांना संपर्क करून धारावीच्या पर्ल रेसिडेन्सी येथे बोलावले. त्यांच्याकडून मोबाईल घेवून पैसे घेवून येतो अशी बतावणी करून बिल्डिंगच्या लिफ्टने पर्किगमध्ये उतरून पळून गेला. याप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक  विजय खंडागळे आणि पथकाने आरोपीचा उपलब्ध सीसीटीव्ही तसेच फिर्यादिला मोबाईल घेण्यासाठी संपर्क केलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध घेतला. तेव्हा त्या मोबाईलचे लोकेशन पुण्यातील स्वारगेट असे दिसले.

प्रथम तिथे त्याचा शोध घेतला परंतू आरोपी न सापडल्याने सीम कार्ड धारकाचा एसडीआर प्राप्त करून शोध घेतला गेला. तेव्हा तो मोबाईलही गोरेगावमधून एका रिक्षा चालकाकडून चोरी झाल्याचे समजले. आरोपीने भांडुप ,घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याने तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्याच्या मोबाईल सीडीआरवरून तो भायखळा-सायन-कुर्ला या परीसरात वारंवार येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायन स्टेशन परीसरात खबरीच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळला. त्याच्यावर अहमदाबादमध्ये विविध पोलीस ठाण्यात १२ तर घाटकोपर, भांडुप आणि टिळक नगरमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटक