शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

गुरूचा शाप लागेल, असे सांगत बलात्कार; आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 9:28 AM

२०१९ मध्ये पीडितेला स्वतःच्या घरी बोलावले आणि प्रसादात गुंगीचे औषध मिसळून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.

मुंबई : कुटुंबीयांना गुरूचा शाप लागेल अशी भीती घालत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. पीडिता पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजते. 

नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यावर याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीचे नाव सुरेशकुमार अवस्थी (वय ५८) असे असून, तो आयटी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. अंधेरीच्या म्हाडा परिसरात तो राहतो. आपल्याकडे दैवी शक्ती आहेत असे भासवत त्याने पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. २०१९ मध्ये पीडितेला स्वतःच्या घरी बोलावले आणि प्रसादात गुंगीचे औषध मिसळून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी ती अल्पवयीन होती. 

त्याने या सगळ्या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्याचा वापर करून सुरेशकुमार पीडितेवर अत्याचार करत होता. तिला त्याने कुर्ला आणि अंधेरी परिसरात त्याच्या निवासस्थानी नेऊन तिथेही अत्याचार केले. सुरेशकुमारविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६, ३२८, ५०६ (२) व पॉक्सो कायदा २०१२ च्या कलम ३, ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.