शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

सीबीआयच्या नावानं तरुणाला घातला गंडा; एका कॉलनं ९.५० लाखाला लागला चुना

By गौरी टेंबकर | Published: May 17, 2024 3:47 PM

सीबीआयचे नाव घेत ९.५० लाखांचा गंडा

मुंबई: तुझ्यावर केस दाखल झाली असून लिगल व्हेरिफिकेशनसाठी सीबीआयच्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगत विद्यार्थ्याला लाखोंचा चुना लावण्यात आला. हा प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार तन्मय परुळेकर (२६)  हा विद्यार्थी बोरिवलीच्या वजीरा नाका परिसरात राहतो. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ मे रोजी त्याला एका अनोळखी मोबाईलवरून रेकॉर्डेड कॉल आला. त्यामध्ये त्याला दिल्ली हायकोर्ट येथून समन्स बजावण्यात आल्याचे म्हणत अधिक माहितीसाठी शून्य डायल करायला सांगितला. तन्मयने शून्य डायल केल्यावर संजय शर्मा नामक व्यक्तीने तो उचलत लजपत नगर येथे आयसीआयसीआय बँकेत त्याच्या नावावर एक खाते उघडण्यात आले असून त्यातून २५ लाखांचे बेकायदेशीर ट्रांजेक्शन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याच्यावर केसही दाखल करण्यात आली आहे. 

याप्रकरणी सायबर अधिकारी पुढील चौकशी करतील असे म्हणत दुसऱ्या व्यक्तीला फोन दिला. त्या दुसऱ्या व्यक्तीने तन्मयचे नाव, त्याच्या बँकेची तसेच त्यातील सेव्हींगची सर्व माहिती घेतली. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट काढून मागत त्यानंतर त्याच्या नावे २५ बनावट फेक अकाउंट उघडण्यात आले असून त्यामुळे त्याच्या खात्यातील रकमेचे लीगल वेरिफिकेशन करावे लागणार असल्याचे म्हणाला. त्यानंतर सायबर अधिकारी म्हणणाऱ्या व्यक्तीने एक बँक खात्याचा नंबर देत ते सीबीआयचे खाते असून रकमेच्या वेरिफिकेशनसाठी खात्यात असलेली १५ लाखांची रक्कम पाठवायला सांगितली. घाबरलेल्या तन्मयने जवळपास ९.५० लाख रुपये भामट्यांना पाठवले मात्र नंतर त्याला संशय आल्याने गुगलवर सर्च केले. तेव्हा अशाच कार्य पद्धतीने अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे त्याला दिसले. फोन कट करत त्यांने मदतीसाठी सायबर पोलिसांच्या १९३० या क्रमांकावर संपर्क करत तक्रार देऊन पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :fraudधोकेबाजी