शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा; ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापा-याचे अपहरण करणा-या चौघांना फिल्मी स्टाईलने अटक

By प्रशांत माने | Published: August 05, 2022 10:08 PM

Crime News : संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत सर्व रा. डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली:  हिम्मत नाहर या प्लायवुड व्यापा-याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रूपयांची खंडणी मागणा-या पाच पैकी चौघांना शहापूर गोठेघर गावाच्या परिसरातून येथून मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आठ तासात अटक केली. नाहर यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ही कामगिरी बजावताना पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांनी गावातील लोकांप्रमाणे कपडयांचा पेहराव करून वेशांतर केले होते.  

संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत सर्व रा. डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत. डोंबिवली पूर्व भागात हिम्मत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड हे दुकान आहे. ३ ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा नावाचा त्यांच्या ओळखीचा व्यक्ती तेथे आला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. अॅडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगून दुकानापासून काही अंतरावर नाहर यांना घेऊन गेला. तेथून नाहर यांना यांना एका गाडीत कोंबले आणि त्यांचे अपहरण केले. रात्री साडेनऊ वाजता नाहर यांचा  पुतण्या जितू यांना मोबाईलवर फोन आला. फोन करणा-या व्यक्तीने तुमचा काका आमच्या ताब्यात आहे तो परत पाहिजे असेल तर ५० लाख रूपये तयार ठेवा आम्ही एका तासात पैसे कुठे जमा करायचे याबाबत कळवितो.

जितू यांनी तत्काळ मानपाडा पोलिस ठाणो गाठले आणि तक्रार दिली. गुन्हयाचे स्वरूप लक्षात घेता पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त. सुनिल कुराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, निसार पिंजारी, पोलीस नाईक प्रविण किनरे, दिपक गडगे, यल्लपा पाटील, देवा पवार, प्रशांत वानखेडे, सुशांत तांबे, अशोक कोकोडे, पोलीस शिपाई ताराचंद सोनावणे, महेंद्र मंजा, संतोष वायकर यांची विशेष पथके नेमली. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील शहापूर गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची पथके गावक-यांच्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोडय़ाच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार त्याठिकाणी आली. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना मला माङया ताब्यात द्या असे सांगितले. तुमच्या काकाला जवळच असलेल्या खोलीत ठेवल्याची माहीती त्यांनी दिली.  त्याचवेळी पोलिसांनी स्वत:च्या गाडया आडव्या टाकून झायलो कारला घेरले आणि तिघांना अटक केली. संबंधित आरोपींना घेऊन घराची पाहणी केली असता त्याठिकाणी आणखीन एक आरोपी आढळुन आला तर अन्य एक आरोपी इक्बाल शेख अंधाराचा फायदा उठवित पळून गेला. अपरहण केलेल्या नाहार यांना एका खोलीत एका पलंगाला दोरीने बांधून ठेवले होते. 

गुन्हयातील कार घेतली होती भाडयानेगुन्हयात वापरलेली झायलो कार ही शिर्डी येथे जायचे आहे हे सांगून एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून भाडयाने घेतली होती. अटक आरोपींपैकी संदीप रोकडे याने ती घेतली होती. ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.आरोपी सुशिक्षित बेरोजगारआरोपी सुशिक्षित बरोजगार असून त्यांनी झटपट पैसे कमविण्यासाठी हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित व्यापा-याची सर्व माहीती काढून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा आरोपींचा डाव होता अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस