इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोलीस जनसुनावणीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनसुनावणीदरम्यान एक पीडिता आपल्यापेक्षा वयाने 19 वर्षांनी मोठा असलेल्या पतीची तक्रार घेऊन पोहोचली. पीडितेचे म्हणणे आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच तिचा पती विविध प्रकारची औषधे घेऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत होता. त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते आणि या सर्व गोष्टींमुळे ती आपल्या पतीचे घर सोडून गेली. ती जवळपास 3 वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहते, परंतु जेव्हा ती आपल्या पतीपासून वेगळी झाली, तेव्हा पतीने 12 वर्षांच्या मुलाला सुद्धा आपल्यासोबत घेतले. आजही तिचा पती विविध कारणांमुळे छळ करत आहे.
दरम्यान, पीडितेला पतीच्या चारित्र्यावर अनेक शंका होत्या. त्यामुळे तिने पतीच्या चारित्र्यावरील संशय दूर करण्यासाठी बनावट नावाने आयडी बनवला आणि पतीशी चॅटिंग करू लागली. यादरम्यान पतीकडून अश्लील गोष्टी जाणून तिला धक्काच बसला. अश्लील गोष्टी चॅट करण्यासोबतच अश्लील व्हिडीओ आणि स्वत: हस्तमैथुन करतानाचे व्हिडिओही पतीने पीडितेला पाठवले होते. यानंतर पीडितेच्या लक्षात आले की, तिच्या पतीचे इतर महिलांसोबतही असेच संबंध असू शकतात. या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार केली आहे.
दुसरीकडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश हिंगणकर यांनी या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या तक्रारीची चौकशी करून आरोपी पतीवर कारवाई करण्यास सांगितले आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती महाराष्ट्रातील नागपूर येथील विमानतळावर विमान वाहतूक विभागात कार्यरत आहे. तसेच, लग्नही घरच्यांच्या संमतीनंतर झाले होते आणि लग्नादरम्यान कुटुंबीयांनी सर्व काही पाहूनच पीडितेचे लग्न तिच्या पतीसोबत केले होते, त्यामुळे काही दिवस पीडितेला पतीकडून त्रास सहन करावा लागला. पण तिचा पती ज्याप्रकारे विविध प्रकारची औषधे खाऊन तिच्याशी शारीरिक संबंध बनवत असे, त्यामुळे ती खूप अस्वस्थ होऊ लागली आणि या सर्व गोष्टींमुळे पीडितेने स्वतःला पतीपासून दूर केले.
कायदेशीर कारवाई करण्याची मागणीपतीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने त्याला सोडून दिले. त्यावेळी पतीने 12 वर्षाच्या मुलालाही आपल्यासोबत नेले आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडितेने घटस्फोटासाठी इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात ज्याप्रकारे त्याचे चारित्र्य उघड झाले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस जनसुनावणीत तक्रारही केली आहे.