लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - व्हॉट्सअप द्वारे अल्पवयीन मुली व तरुणींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायास लावणाऱ्या उल्हासनगर मधील दलाल महिलेस भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने काशीमीरा भागातून सापळा रचून अटक केली आहे . वेश्या व्यवसाय साठी आणलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे .
पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि , उल्हासनगर भागातील रितू नावाची वेश्या दलाल हि पुरुष ग्राहकांना व्हॉट्सअप द्वारे वेश्यागमना साठी अल्पवयीन मुली व तरुणी पुरवते . अल्पवयीन मुलींचे कौमार्यभंगसाठी ती मोठी रक्कम घेते .
अहिरराव यांनी बोगस गिऱ्हाईक द्वारे रितू कडे विचारणा केली. त्यानुसार ती १० मे रोजी काशीमीरा महामार्गावरील न्यू दिल्ली दरबार हॉटेल जवळ १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी व एका तरुणीला वेश्यागमना साठी घेऊन आली . अल्पवयीन मुलीचे कौमार्यभंग करण्याच्या बोलीवर मोबदला म्हणुन मोठी रक्कम ठरवुन तिने ती बोगस गि-हाईका कडुन घेताच सापळा लावून असलेले अहिरराव सह उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, शुभांगी मोकल यांनी तिला पकडले .
तिच्या कडे चौकशी केली असता तिचे नाव कविता उर्फ रितु शंकर प्रजापती सिंग (३०) रा. उल्हासनगर असल्याचे निषपन्न झाले . तिच्या कडून रोख रक्कम सह मोबाईल आदी हस्तगत केला आहे . या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .