शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

पाकिस्तानी युवकाशी लग्न अन् आधार कार्डवर नाव बदलणं ठाण्याच्या युवतीला महागात पडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 4:24 PM

२२ जुलैला पोलिसांकडून समन्स मिळाल्यानंतर नगमा ३ दिवस वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशीला गेली.

ठाणे - अनेक लोक आपल्या आवडत्या फिल्म स्टार, क्रिकेटर अथवा राजकीय नेत्यांच्या नावावर त्यांचं स्वत:चं नाव ठेवतात. ही खूप सामान्य गोष्ट आहे परंतु नाव बदलणं कधी खूप महागातही पडू शकते. ठाण्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. जिथं २७ वर्षीय नगमा नूर मकसूदअलीला तिचं नाव बदलल्यामुळे कायदेशीर कोंडीत अडकावं लागलं आहे. 

नगमानं १० वर्षापूर्वी आधार कार्ड बनवताना स्वत:चं नाव सनम खान लिहिलं होते. तिला तिचं नाव पसंत नव्हते. त्यानंतर एका स्थानिक दुकानदाराच्या मदतीने तिने नावात बदल केला. अलीकडेच एका पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न आणि पाकिस्तानात जाण्यासाठी तिच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली तेव्हा तिने नाव बदलल्याचा खुलासा समोर आला आहे.

माहितीनुसार, नगमानं २०१५ साली बेकायदेशीरपणे स्वत:चं नाव बदलून सनम खान असं केले होते. तिने अनेक चित्रपटात हे नाव ऐकलं होतं. त्यामुळे हेच नाव ठेवायचे तिने ठरवले. २०२२ मध्ये नगमानं पाकिस्तानातील एका युवकासोबत ऑनलाईन भेट केली त्यानंतर त्याच्यासोबत निकाह केला. नगमाला आधीच्या लग्नापासून २ मुली होत्या. यावर्षीच्या सुरुवातीला ती मुलींसह पाकिस्तानच्या एबटाबाद येथे गेली. १७ जुलैला आजारी आईची देखभाल करण्यासाठी ती पुन्हा ठाण्यात परतली. मात्र पाकिस्तानातून भारतातील प्रवासावेळी तिच्या कागदपत्रांची पडताळणी केली आणि त्यात हा प्रकार उघडकीस आला.

पाकिस्तानची हेर असल्याचा आरोप

२२ जुलैला पोलिसांकडून समन्स मिळाल्यानंतर नगमा ३ दिवस वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशीला गेली. तपासात तिचा पासपोर्ट आणि पॅनकार्डसारखी कागदपत्रे सनम खान नावाने कसे मिळवले याची विचारणा करण्यात आली. ही भनक माध्यमांना लागताच नगमावर पाकिस्तानी हेर असल्याचा आरोप झाला. काही लोकांनी तिची तुलना सीमा हैदरची केली जी पाकिस्तानची नागरिक असून बेकायदेशीरपणे भारतात आली. 

अवघ्या २० हजारात बदललं नाव

इंडियन एक्सप्रेस रिपोर्टनुसार, नगमाविरोधात बनावट कागदपत्रे बनवून आधार कार्ड बनवल्याचा गुन्हा दाखल झाला असून २५ जुलैला तिला अटक करण्यात आली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला जामीनावर सोडण्यात आले. या प्रकरणी दुकानदारांवरही गुन्हा नोंद झाला आहे. दुकानदाराने नगमाला तिच्या आवडीच्या नावाने जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून देण्यासाठी २० हजार रुपये घेतले. त्यात तिची जन्म साल १९९७ ऐवजी २००१ केले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी