मुजफ्फरपूरच्या एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करणारी किन्नर चंदासोबत मोतीपूर येथील पंकजने मंदिरात लग्न केलं होतं. दोघे 5 वर्षापासून सोबत राहत होते. पण पती बनलेला पंकज दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच किन्नर चंदाने मोतीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूरच्या सिद्दकी लेनमध्ये राहणारी चंदा आणि नारियार पानापूर येथील पंकज कुमार सााह सोबत एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होते. यादरम्यान पंकज चंदाच्या प्रेमात पडला. दोघेही सोबत राहू लागले होते आणि मग एक दिवस त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं.
लग्नानंतर 5 वर्ष दोघेही पती-पत्नीसारखे सोबत राहिले. पण आता पंकज पत्नी चंदाला सोडून गुपचूप दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच किन्नर चंदाने पोलिसात पंकजला पती असल्याचं सांगत आणि लग्नाचे फोटो दाखवत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, चंदा आपल्या दोन बहिणीचं आणि आईचं पोट भरण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करत होती. यादरम्यान पाच वर्षाआधी तिची भेट पंकज कुमार शाहसोबत झाली. दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी सहमतीने 2018 मध्ये हिंदू रितीरिवाजाने लग्न केलं. नंतर ते पती-पत्नीसारखे राहू लागले.
चंदाने आरोप केला की, तिने तिच्या कमाईने पंकजसाठी घर बांधलं. पण आता पंकज दुसरं लग्न करत आहे. तिला घरातून काढलं आहे. पती आता तिला तिचे पैसेही परत करत नाहीये. चंदाचा आरोप आहे की, कथितपणे पती तिला जीवे मारण्याची धमकीही देत आहे. पती आता तिला कोणतं लग्न, कोणता पती? असं म्हणतो.
तेच आरोपी तरूण पंकज कुमार शाह म्हणाला की, त्याचं लग्न कोणत्याही किन्नरसोबत झालं नाही. तो तिच्यासोबत ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होती. यादरम्यान किन्नरने त्याला जाळ्यात अडकवलं. ज्यानंतर ते सोबत राहू लागले होते. पण सोबत राहत असताना सुद्धा तिचं वागणं बरोबर नव्हतं. नेहमीच मारहाण आणि भांडण करत होती. ती मला गुलामासारखी ठेवत होती.
याबाबत पोलीस म्हणाले की, किन्नर चंदाने पंकज साह याला आपला पती सांगत पैसे हडपणे, दगा देणे, दुसरं लग्न करण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. सध्या चौकशी सुरू असून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.