जबलपूर - मध्य प्रदेशाच्या सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जबलपूर इथं स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार चालत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याठिकाणच्या आणखी एका स्पा सेंटरबाबत खुलासा झाला आहे. जिथे मुलींना सॅलरीच्या बदल्यात ग्राहकांशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केले जात होते. एका मुलीने समोर येऊन याची पोलीस तक्रार केली आहे. तिची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले.
आसामच्या गुवाहाटी इथं राहणाऱ्या तक्रारदार युवतीने रात्री उशीरा ओमती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात ती म्हणाली की, जबलपूरच्या काही स्पा सेंटरमध्ये मुलींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव आणला जातो. जर तिने नकार दिला तर मुलीला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना खुश करण्यास सांगितले जाते. जर एखाद्या मुलीने ग्राहकाला चांगले खुश केले तर तिला सॅलरीसोबत बक्षीस दिले जाते असं तिने तक्रारीत सांगितले.
तसेच मला नोकरीवर ठेवताना चांगले वेतन आणि सुरक्षित वातावरण देण्याचं आश्वासन दिले होते परंतु काही महिन्यांनी माझ्यावर अनैतिक संबंधांसाठी दबाव आणले. जेव्हा याला विरोध केला तेव्हा मला छळण्यात आले असा आरोपही तक्रारीत युवतीने सांगितले. या युवतीच्या तक्रारीवरून ओमती पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित स्पा सेंटरवर छापेमारी केली. त्याठिकाणाहून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले जे त्यावेळी स्पा सेंटरमध्ये हजर होते.
पोलिसांनी स्पा सेंटरच्या संचालकांची चौकशी सुरू केली आहे. या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. युवतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, काहींना ताब्यात घेतले आहे. जर स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य असल्याचं समोर आल्यास त्यावर कठोर कारवाई करू असं पोलीस अधिकारी राजपाल सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, जबलपूरच्या स्पा सेंटरमध्ये असे प्रकार पहिल्यांदाच समोर आले नाहीत तर याआधीही अनेकदा हे घडले आहे. परंतु यावेळी एखाद्याने युवती स्वत: पुढे येऊन तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर स्पा सेंटरवरही नजर ठेवली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासन कठोर पाऊले उचलत आहेत.