संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
सतत हसतोय अन् म्हणतोय एकाच गोष्टीचाच पश्चाताप वाटतोय; आफताबचा पोलिसांना जबाब
आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. आफताबची २० पेक्षा जास्त महिलांसोबत मैत्री होती. या सर्वांसोबत एका डेटिंग अॅपवरुन मैत्री झाली होती. तसेच यामधील अधिक महिलांसोबत त्यांने शारिरीक संबंध ठेवले होते. स्वत: आफताबने याबाबत खुलासा केला आहे.
आफताब आणि श्रद्धा यांच्यात दररोज भांडण व्हायचे. १८ मे रोजी देखील दोघांमध्ये मोठं भांडण झालं. मात्र हे भांडण श्रद्धाच्या आयुष्यातील शेवटचं ठरलं. १८ मे रोजी मुंबईच्या घरातील सामान दिल्लीत आणण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. घराचा खर्च कोण सांभळणार यावरुनही भांडण झालं. श्रद्धा वारंवार घरातील खर्चाबाबत बोलत असल्याने आफताबला राग अनावर झाला. त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गळा दाबून श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने सांगितलं.
श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं!
श्रद्धाची हत्या करायला नको होती. फक्त याच एका गोष्टीचा मला पश्चाताप होतोय. मात्र हत्या करुन शरिराचे तुकडे केल्याचा कोणताही पश्चाताप मला वाटत नसल्याचं आफताबने पोलीस चौकशीत सांगितलं. तसेच शरिराचे तुकडे व्यवस्थित होण्यासाठी तो पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करायाचा, असा जबाब देखील आफताबने पोलिसांना दिला आहे. आफताबच्या या माहितीनंतर पोलिसांनी डेटिंग अॅपला पत्र लिहित संबंधित महिलांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल.
फोटोला ‘हॅपी डेज’ कॅप्शन-
श्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"