मुख्तार अन्सारीची सून आणि अब्बास अन्सारीची पत्नी निखत अन्सारी हिला १६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ती आणि अब्बास हे जेलमध्ये बिनदिक्कत तासंतास भेटत होते. याची टीप मिळाल्याने पोलीस अधिक्षक आणि जिल्हादंडाधिकाऱ्यांनी छापे टाकून निखतला जेलरच्या रुममधून पकडले होते.
आमदार अब्बास अन्सारी जेलमध्ये, रोज तीन तास पत्नी निखतसोबत रंगरलिया; छापा पडताच...
कडक बंदोबस्तात पोलिसांनी निखतला रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. आमदार अब्बास याला तुरुंगातून पसार करण्याचा कट रचत असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. या साऱ्या प्रकरणावर मुख्तार अन्सारीचा दुसरा मुलगा उमर अन्सारी याने वेगळेच आरोप केले आहेत.
शुक्रवारी सामान्य नागरिकांप्रमाणे माझी वहीणी निखत ही तुरुंगातून बाहेर येत होती. तेव्हा तिला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. मोबाईल, रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ते खोटे असून बी जप्ती हा कटाचा भाग असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अब्बास अन्सारी यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. निखत ही अब्बासच्या खटल्याची तयारी, भेटीगाठी करत होती, यामुळे तिलाही गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
चित्रकूटच्या तुरुंगात तेव्हा मोठी खळबळ उडाली जेव्हा आमदार अब्बास अन्सारी त्याच्या पत्नीसोबत जेलमध्ये रंगरलिया करत होता आणि जिल्हाधिकारी, एसपींचा छापा पडला. अब्बास आणि त्या पत्नी निखत हे दोघे दररोज जेलरच्या खोलीत भेटत होते. जेव्हा छाप्यात रुम उघडली गेली तेव्हा निखत रुममध्ये सापडली. तिच्याकडून पैसे, मोबाईल आणि अवैध वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. निखतला अटक करण्यात आली. तिच्यावर पतीला तुरुंगातून पळविण्याचा कट रचल्याचाही आरोप केला जात आहे.
अब्बासची पत्नी निखत बानो ही गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सकाळी ११ वाजता कारागृहात येत होती व ३-४ तास सोबत घालवून परत जात होती, अशी खबऱ्याने टीप दिली होती. यावरून छापेमारी करण्यात आली होती.