शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुलीच्या लग्नासाठी केले मालकाच्या मुलांचे अपहरण; एक कोटीच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 2:50 AM

तासाभरात सुटका, चालकानेच रचला कट

मुंबई : टेबल टेनिसचा क्लास उरकून घरी निघालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या १० वर्षांच्या जुळ्या मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली. मात्र, अवघ्या तासाभराच्या आत पोलिसांनी मुलांची सुटका केली. मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी एक कोटीच्या खंडणीसाठी विश्वासू चालकानेच अपहरणाचा कट रचल्याची माहिती चौकशीत उघडकीस आली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

जुहूत राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची १० वर्षांची जुळी मुले कारमधून अंधेरी येथे नेहमीप्रमाणे टेनिसच्या क्लाससाठी गेली हाेती. २५ जानेवारीला सायंकाळी त्यांचा चालक डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धडकला. हंबरडा फोडत त्याने, मुलांना कारमधून घरी घेऊन जात असताना एक तरुण कारमध्ये घुसला. त्याने चाकूच्या धाकाने मुलांसह मला औषधी गोळ्या खाण्यास भाग पाडले. चालत्या वाहनात मुलांचे हातपाय बांधले. पुढे क्रोमा मॉल परिसरात एका मुलाला तेथे उभ्या असलेल्या शाळेच्या बसमध्ये कपड्याने बांधून बसविले. दुसऱ्याला पीव्हीआर सिनेमासमोर कार पार्क करून ठेवले. मला मारहाण केली, पण मी त्याच्या तावडीतून पळ काढल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

तेथे उभ्या गाडीत एक अपहृत मुलगा हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. त्याची सुटका करून पथक पुढील तपासासाठी रवाना होणार इतक्यात अन्य मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घरी संपर्क साधल्याची माहिती त्यांना मिळाली.पुढे आरोपींच्या शोधासाठी सहायक आयुक्त ज्योत्स्ना रासम, डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी चालकाची तपासणी सुरू केली. घटनाक्रमात तफावत जाणवत असल्याने त्याच्यावरचा संशय वाढला. त्यात एकाच व्यक्तीने एवढे सगळे केले यावर विश्वास बसत नव्हता. तब्बल १८ तासांच्या चौकशीअंती चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. चालकाच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्न थाटामाटात करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. मालकाकडे मदत मागण्याऐवजी त्याच्याकडे खूप पैसे असल्याने त्याने अपहरणाचा बनाव करत पैसे उकळण्याचे ठरवले होते.

अ‍ॅपद्वारे इंटरनॅशनल कॉलअपहरणासाठी चालकाने दिल्लीतील मेव्हण्याला मुंबईत बोलावून घेतले. मेव्हण्याने एका मोबाइल कंपनीत काम केले असल्याने त्याला तांत्रिक बाबींची माहिती होती. अपहरणानंतर त्याने एका अ‍ॅपद्वारे बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीला फोन करून एक कोटीची खंडणी मागितली. व्यावसायिकाच्या पत्नीला परदेशातून फोन आल्याचे वाटले होते.

१० वर्षांपासून हाेता नोकरीलाआरोपी चालक हा व्यावसायिकाकडे १० वर्षांपासून नोकरीला होता. त्याआधी व्यावसायिकाच्या आजोबांकडे काम करीत होता.

टॅग्स :Policeपोलिस