अभिनेता सुशांतच्या कथित आत्महत्येनंतर अंमली पदार्थ तस्कर एनसीबीच्या रडारवर आले असून गेल्या वर्षभरात एनसीबीने राजकीय धेंडांच्या जावयापासून अनेक बड्या बड्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुशांतला मिळत असलेल्या अंमली पदार्थांची लिंक गोव्यापर्यंत लागली होती. आता अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी गोवा एनसीबीने सपा नेत्याचा जवळच्या व्यक्तीला नोटीस पाठविली आहे. (Abu Aslam Azmi summoned by Goa NCB today in connection with the drugs matter related to peddler Sufran Lakdawala who was arrested on 8th July. )
गोवा नार्कोटिक्स ब्युरोने (एनसीबी) शनिवारी अबू असलम आझमीला ड्रग पेडलर सफ्रान लकडावालाशी संबंधीत असल्याने चौकशीला बोलावले आहे. लकडावालाला गोवा एनसीबीने ८ जुलैला अटक केली होती. एनसीबीने याची माहिती दिली आहे.
अबू असलम आझमी हा समाजवादी पार्टीच्या एका बड्या नेत्याचा खास आहे. अबू आझमीला २०१८ मध्ये देखील दिल्लीच्या स्पेशल सेलने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात ३५वी अटक मे मध्ये करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सर्वात मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी याला हैद्राबादला बेड्या ठोकल्या. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही. यामुळे एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते. अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) गोवा येथून ड्रग्ज पेडलर हेमल शाह याला देखील सुशांत प्रकरणी अटक केली होती.