शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मित्राकडूनच अत्याचार; शाळकरी मुलगी गर्भवती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 7:49 AM

ठाण्यातील डायघर पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली. पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळेत जाण्याच्या बहाण्याने ते एकमेकांना भेटत असत. त्यांच्या या प्रकाराबद्दल दोघांचेही कुटुंबीय अनभिज्ञ होते.

दोघांच्याही भेटीदरम्यान चार ते पाच महिन्यांपूर्वी या मुलाने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, याची तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती दिली नाही. तिच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून दुखत होते, तसेच मासिक पाळीचाही त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. 

हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी रात्री बलात्कारासह पोक्सोअंतर्गत डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलाला बाल न्यायालयात पाठविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदा