लातूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आराेपीला सात वर्षाची सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे न्यायाधीश बी.सी.कांबळे यांनी ठाेठावली आहे. रेणापूर तालुक्यातील खराेळा शिवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचर करण्यात आल्याची घटना २८ ऑगस्ट २०१५ राेजी घडली हाेती. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये आराेपी दिगंबर व्यंकट गाैड (माळी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला हाेता.
आराेपीने पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून, पीडितेचे ताेंड दाबून शेतातील पिकामध्ये नेवून अत्याचर केले. पीडित मुलीच्या आईने मुलगी घरात नसल्याने शाेधाशाेध सुरू केली असता, ती शेतातील पिकात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. पीडित मुलीचे आई-वडिल सालगडी म्हणून काम करतात. त्यांनी उपचारासाठी खराेळा येथील रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी रेणापूर येथील रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर पीडित मुलगी शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेला प्रसंग आई-वडिलांना सांगितला होता.
याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात जबाब नाेंदविण्यात आला. वडिलांच्या तक्रारीवरुन आराेपी दिगंंबर व्यंकट गौड (माळी) याच्याविराेधात पाेस्काेअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलिसांनी तातडीने तपास करुन लातूरच्या न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. पीडित मुलगी, आई-वडिल आणि एक स्वतंत्र साक्षीदाराची साक्ष महत्वपूर्ण ठरली. शिवाय, सबळ पुरावा सादर करत अॅड. मंंगेश महिंद्रकर यांनी युक्तीवाद केला.
अंतिम सुनावणीनंतर विशेष न्यायालय (पोक्सो) न्यायाधीश बी.सी.कांबळे आराेपी दिगंंबर गौड (माळी) याला कलम ३७६ भादंवि आणि कलम ४ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाेषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात अॅड. विद्या वीर, अॅड. अंकिता धूत, अॅड. सोमेश्वर बिराजदार यांंनी सहकार्य केले. तर गुन्ह्याचा तपास चाकूर येथील उपविभागीय पाेलीस अधिकारी विजय कबाडे यांनी केला.