शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

नळ जोडणीकरिता लाच घेणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यास एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 9:17 PM

मीरा भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

ठळक मुद्दे नळ जोडणी करुन देण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यासह साथीदारास अटकपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील फिटर रॉयर पॅरियन (५२ ) याने साडे आठ हजार रुपयांची मागणी केली.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात नविन नळ जोडणी वा अन्य जलवाहिनीवरुन देण्यासाठी चालणाऱ्या गैरप्रकारांच्या तक्रारी व आरोप सातत्याने होत आले असतानाच आज शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास नळ जोडणी करुन देण्यासाठी साडे आठ हजार रुपयांची लाच घेताना साथीदारासह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेअटक केली आहे.नवघर पोलीस ठाणे हद्दीतील एका गृहनिर्माण संस्थेने अपुरा पाणी पुरवठा होतो म्हणुन महापालिकेने त्याच भागात टाकलेल्या नविन जलवाहिनीतुन नळ जोडी देण्यासाठी अर्ज केला होता. आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरल्यानंतर नव्या जलवाहिनीवरुन नळ जोडणी मंजूर झाली. सदर नळ जोडणी पालिकेच्या नव्या जलवाहिनीतून  करुन देण्यासाठी गृहनिर्माण संस्थेने पालिकेत दिड हजार रुपयांचे शुल्क देखील भरले.तसे असताना नळ जोडणी करण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील फिटर रॉयर पॅरियन (५२ ) रा. भोला नगर, भाईंदर पश्चिम स्मशाना जवळ याने साडे आठ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी संस्थेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पोलीसांनी १५ जानेवारी रोजी खात्री करुन घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी सापळा रचून लाचेची रक्कम घेताना पॅरियनसह त्याचा खाजगी साथीदार बाबु राजेंद्रन (२५) या दोघांना पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली उपअधीक्षक शशिकांत चांदेकर सह खान, टेतांबे व बजागे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पॅरियन हा सदरची रक्कम कोणासाठी घेत होता वा त्यात कोणा कोणाला वाटणी जात होती याचा तपास पोलीस करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या जन्म मृत्यु विभागातील अधिकाऱ्यास २० हजाराची लाच घेताना अटक झाली होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकMuncipal Corporationनगर पालिकाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक