ठाणे - चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दंडाची ९० हजारांची रक्कम वसूल न करण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता मोहम्मद जव्वादउल्ला सिद्दीकी (27 रा. राबोडी) आणि तंत्रज्ञ विलास प्रभाकर कांबळे (46 रा. घाटकोपर) या दोघांना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तक्रारदारांच्या सासूबाई यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व दंडाची रक्कम वसूल न करण्यासाठी त्यांच्याकडे ३० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार, तक्रारदारांनी ठाणो एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सापळा रचून पैसे घेताना त्याना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पुढील तपास ठाणे एसीबी करत आहे.