शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जेसीबी परत देण्यासाठी शेतकऱ्याकडे मागितले 1 लाख रुपये, तीन वनकर्मचार्‍यांसह चौघांना एसीबीकडून अटक    

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 3:07 PM

Bribe Case : तिवसा तालुक्यातील चिखली फाट्यावर खासगी व्यक्तीमार्फत ही रक्कम वनकर्मचाऱ्यांनी स्वीकारली.

ठळक मुद्देअमरावती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याला वनजमिनीवर खोदकाम केल्याचे सांगून त्याचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला होता.

अमरावती/तिवसा : वनजमिनीवर खोदकाम केल्याची बतावणी करून त्यासंबंधी कोणतीही कारवाई न करण्यासाठी व जप्त केलेला जेसीबी सोडविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनविभागाच्या तीन कर्मचार्‍यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने मंगळवारी अटक केली. तिवसा तालुक्यातील चिखली फाट्यावर खासगी व्यक्तीमार्फत ही रक्कम वनकर्मचाऱ्यांनी स्वीकारली.

वनपाल तथा माळेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक सुरेश संपतराव मनगटे (५३), वनरक्षक तथा माळेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक प्रभुदयाल प्रकाश चौधरी (३९), वनमजूर तथा मालेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक संजय वासुदेवराव माहोरे (५६) व तिवसा येथील रहिवसी प्रशांत राजेंद्र भडके (३७) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेअटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरावती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याला वनजमिनीवर खोदकाम केल्याचे सांगून त्याचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व जेसीबी सोडविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी प्रशांत घोडकेमार्फत देण्यास कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यासाठी शेतकऱ्याला मार्डी ते वऱ्हा मार्गावरील चिखली फाट्यावर बोलावले होते. 

प्रकरणाची पडताळणी २४ डिसेंबर रोजी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांना सदर तक्रारीबाबत कळविल्यानंतर २८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, सहायक उपनिरीक्षक श्रीकृष्ण तालन, पोलीस नायक सुनील युवराज राठोड, पोलीस शिपाई अभय वाघ, तुषार देशमुख, वाहनचालक चंद्रशेखर जनबंधू यांनी सापळा रचून लाचखोरांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAmravatiअमरावतीArrestअटकforest departmentवनविभागFarmerशेतकरी